period. 
health-fitness-wellness

अतिस्त्रावी मासिकपाळी

डॉ. सुषमा देशमुख

रीतु वय ४२ आज तिच्या १३ वर्षाच्या मुलीला, नितीला घेऊन आली होती. नितीला दोन वर्षांपासून मासिकपाळी चालू झाली होती. गेल्या एक वर्षापासून अनियमित व अतीरक्तस्त्राव होत होता. रीतूला पण गेल्या दोन वर्षांपासून हाच त्रास सुरू होता. उपचार करून दोघीही थकून गेल्या होत्या. रीतू कंटाळून म्हणाली, 'डॉक्टर माझे तर तुम्ही ऑपरेशन करून टाका एकदाचे. पण नितीचं काय करायचं? आम्हालाच हा त्रास का? जरा सविस्तर सांगा ना. मी तिला शांत करीत म्हटलं, 'बऱ्याच मुलींना, महिलांना अशाप्रकारचा त्रास असतो.

अतिस्त्रावी पाळी म्हणजे काय?
साधारणत: मासिकपाळी ही दर अठ्ठावीस-तीस दिवसांनी येते. यामध्ये गर्भाशयाच्या आंर्तभीतीवरचे आवरण रक्तस्त्रावासहित बाहेर फेकले जाते. हा रक्तस्त्राव ४०-६० मि.ली. इतका असतो. ज्या स्त्रियांमध्ये ८० मि.ली. पेक्षा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो त्यांना अतिस्त्रावी पाळीचा त्रास आहे असे समजले जाते.
अशा प्रकारच्या पेशंटची आम्ही त्यांच्या वयाप्रमाणे वर्गवारी करतो.
१. पौगंडावस्थेतील मुली (११ ते २० वर्षे)
२. प्रजननशील महिला (२० ते ४० वर्षे)
३. प्रौढावस्थेतील महिला (४० वर्षापुढील वयोगट) किंवा (३५ ते ५५ वर्षे)
४. रजोनिवृत्तीनंतरचा वयोगट (५० ते ५५ वर्षापुढील वयोगट)
पौगंडावस्थेतील मुली :
कारणे
१. मुख्य कारण म्हणजे बाल्यावस्थेतून पौगंडावस्थेकडे जाताना शरीरात वाढणाऱ्या हार्मोन्सची अनियमितता :
अ. स्त्री हार्मोन्स
ब. थायरॉईड हार्मोन्स
इतर हार्मोन्स. उदा. पॉलिसिस्टक ओव्हरीयन सिंड्रोम
२. रक्तपेशींचे विकार
गर्भाशयाचे व अंडकोशाचे विकार उदा. गर्भाशयाच्या गाठी (Fibroids),
३. कांही जंतुंच्या उपसर्गामुळे अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो.
४. प्रजनन संस्थेचे कर्करोग : याचे प्रमाण अगदीच नगण्य असते
५. कधी कधी गर्भधारणेशी निगडित कारणे असू शकतात.
उपचार
१. या मुलींना खुप मोठया उपचारांची गरज नसते.
२. त्यांना या त्रासाबद्दल विश्वासात घेऊन आहार, व्यायाम याबद्दल माहिती व काही जुजबी औषधोपचार केल्यास प्राथमिक अवस्थेत असलेल्या मुलींना हे उपचार लागू पडतात.
३. कधी कधी हार्मोनल उपचार पण करावे लागतात.
४. आणि अगदीच अशक्यप्राय पेशंटमध्ये ऑपरेशनचा विचार करावा लागतो.
२) प्रजननशील अवस्थेतील महिला :
कारणे
१. गर्भारपणाशी निगडीत कारणे
२. गर्भनिरोधक उपाययोजनांमुळे उद्भवणारा अनियमित रक्तस्त्राव
३. सुरवातीपासूनच हार्मोन्सच्या अनियमितपणामुळे असणारा रक्तस्त्राव
४. गर्भाशयाशी निगडित आजार
अ. गर्भाशयातील गाठी
• फायब्रॉइड(गर्भाशयाच्या स्नायुंच्या गाठी )
• पॉलिप : गर्भाशयाच्या अंतर्भितींवरील गाठ
ब. कर्करोग
५. रक्तपेशींचे विकार
६. गर्भाशय व गर्भाशयाच्या आजूबाजूला जंतूंचा प्रादूर्भाव होणे.
७. एण्डोमेट्रिऑसिस
तपासणी
१. शारिरिक तपासणी
२. रक्ताच्या तपासण्या, कधी कधी विशेष हार्मोन्सच्या तपासण्या
३. सोनोग्राफी आवश्यकतेनुसार करावी लागते.
४. बायोप्सी काही विशेष शंका आल्यास
अ. गर्भाशयाच्या अंर्तभितीचा (Endomeytium) तुकडा तपासावा लागतो.
ब. गर्भाशयाच्या मुखाची तपासणी व बायोप्सी करावी लागते.
५. दुर्बिणीतून तपासणी : गर्भाशयाच्या आतील भागाची तपासणी दुर्बिणीद्वारे केली जाते. (Hysteroscopy) कधी गर्भाशयाच्या आत गाठ असू शकते. दुर्बिणीद्वारे ही गाठ काढता येते व मोठी शस्त्रक्रिया टाळता येते.
उपाय
१. लट्ठ स्त्रियांनी आहारावर नियंत्रण ठेवून व्यायामाबद्दल नियमित असले पाहिजे.
२. जरूरीप्रमाणे बायोप्सी करणे आवश्यक असते.
३. हार्मोनल उपचार
४. हार्मोनयुक्त Intra uterine Device : प्रोजेस्टेरॉन हार्मोनयुक्त असलेले हे डीव्हाईस गर्भाशयात बसवले जाते. त्यामुळे रक्तस्त्राव आटोक्यात येतो व त्याचबरोबर महिलांमध्ये हे कुटुंबनियोजनाचे साधन म्हणून पण काम करते.
५. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया : दुर्बिण (Hysteroscope) योनीमार्गाद्वारे टाकून आतल्याआतच गर्भाशयाची गाठ काढता येते.
६. काही वेळा दुर्बिणीच्या सहाय्याने गर्भाशयातील अंतभिती जाळून टाकता येतात (Endometrial ablation)
७. थर्मल बलून थेरपी : यामध्ये एका विशिष्ट उपकरणाच्या सहाय्याने गर्भाशयाची अंर्तभिती अति तापमानाने नष्ट करतात.
८. गर्भाशयाचे ऑपरेशन (Hysterectomy)
विशेषत: गर्भाशयाच्या मोठया गाठी, बरी न होणारी हार्मोन्सची अनियमितता, कर्करोग यामध्ये ही सर्जरी केली जाते. पेशंटच्या वयाप्रमाणे किंवा त्रासाप्रमाणे अंडकोष काढायचा की नाही याचाही निर्णय त्याचवेळी घेतला जातो.
३) प्रौढावस्थेतील महिला :
कारणे
१. महत्त्वाचे कारण म्हणजे वयपरत्वे येणारी हार्मोन्सची अनियमितता
२. कर्करोग (गर्भाशयाचा)
३. गर्भाशयाच्या गाठी
तपासणी
१. शारिरिक तपासणी, रक्त व हार्मोन्सच्या तपासण्या
२. सोनोग्राफी केलीच पाहिजे.
३. हा वयोगट जोखमीचा असल्यामुळे बायोप्सी सुद्धा करणे अगदीच आवश्यक आहे.
४. दुर्बिणीतून तपासणी : दुर्बिणीतून तपासणी व बायोप्सी या दोन्ही तपासण्या एकत्रच केल्या पाहिजेत.
उपचार
१. बायोप्सीमध्ये जर हार्मोनल अनियमितता असेल तर त्याप्रमाणे उपचार करावे लागतात.
२. बायोप्सीच्या रिपोर्टनुसार काही वेळा गर्भाशय पण काढावे लागते.
३. दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या अंतर्भीती नष्ट करणे, थर्मल बलून थेरपी, मिरेना हे उपचार पण करता येतात.
४) रजोनिवृत्तीनंतरचा वयोगट :
बऱ्याच कमी स्त्रियांना हा त्रास होतो.याला post menopausal bleeding म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव असे म्हणतात. कारणे :
अ. गर्भाशयाचा कर्करोग
ब. काही तुरळक प्रमाणात आढळणारी कारणे
१. काही औषधांमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. उदा. कर्करोगावर वापरली जाणारी औषधे
२. गर्भनिरोधक तांबी गर्भाशयातच राहणे
लक्षणे : अधुन मधुन अचानक होणारा रक्तस्त्राव किंवा डाग
तपासणी :
अ) बायोप्सी : या वयोगटामध्ये कॅन्सरचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे बायोप्सी करणे हे अति आवश्यक असते.
ब) दुर्बिणीतून तपासणी
उपचार
१. सर्जरी : गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण या वयात बरेच वाढते म्हणून गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशा या वयांच्या वेगवेगळया टप्यांवर अतिस्त्रावी मासिकपाळी महिलांसाठी त्रासदायकच असते. पण म्हणूनच या बाबतीत स्त्री रोगतज्ञांबरोबर चर्चा करून तपासणी करून घ्यावी, त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. कारण या अनमोल आरोग्याची निगा आपणच राखली पाहिजे व स्त्री जन्माची प्रभात, मध्यान्न व सांजवेळ सुखकर केली पाहिजे.
थोडक्यात
अतिस्त्रावी मासिकपाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळया वळणांवर नेहमीच आढळणारा प्रश्न आहे.
किशोरवयीन मुलींमध्ये मुख्यत्वे कारण ‘स्त्री हार्मोन्सची अनियमितता' तसेच रक्त व रक्तपेशींमधील आजार किंवा गर्भाशयाचे विकार ही कारणे पण असू शकतात. त्यामुळे या वयातील मुलींच्या त्रासाकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे.
प्रजननशील महिलांमध्ये विशेषतः गर्भारपणाशी निगडित कारणे असतात.
प्रौढावस्थेतील महिलांमध्ये स्त्रीहार्मोन्सची अनियमितता हे मुख्य कारण असते. पण कर्करोगाची पण शक्यता असू शकते.
अतिस्त्रावी मासिकपाळीच्या उपचारांची आखणी करतांना, वयोगट, कारण, बायोप्सी या बाबीवर लक्ष दिले जाते.
सोनोग्राफी, हिस्टेरोस्कोपी (गर्भाशयाची आतून दुर्बिनीद्वारे तपासणी व उपचार) ही उपकरणे अतिस्त्रावी मासिकपाळीच्या त्रासांमध्ये निदानासाठी व उपचारासाठी मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT