Home Remedies on Migraine Esakal
health-fitness-wellness

Migraine: थंडीत मायग्रेनची समस्या वाढते? हे सोपे घरगुती उपाय करून पहा!

Home Remedies on Migraine: मायग्रेनची समस्या हिवाळ्यात वाढते. मायग्रेनमुळे डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात.

सकाळ डिजिटल टीम

मायग्रेनवरचे घरगुती उपाय (Home Remedies on Migraine):

जगात क्वचितच अशी कोणतीही व्यक्ती असेल की ज्याला कधीही डोकेदुखी झाली नसेल. एक कप कडक चहा पिऊन किंवा एखादं औषध घेतल्याने ही डोकेदुखी दूर होते. कधीकधी झोपेचा अभाव, तणाव किंवा कमजोर डोळे यामुळे देखील डोखेदुखी होते. त्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. त्याचवेळी काही लोक मायग्रेनचे (Migraine) रुग्ण देखील असतात.

ज्या लोकांना मायग्रेनची (Migraine) समस्या असते, त्यांची समस्या हिवाळ्यात वाढते. मायग्रेनमुळे डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. तुम्हालाही अनेकदा थंडीच्या वातावरणात मायग्रेनचा त्रास होत असेल तर आज आपण त्यावरील काही घरगुती उपायांवर चर्चा करणार आहोत.

मायग्रेनची कारणे (Causes of Migraine)-

मायग्रेनमुळे अनेकदा डोक्याचा अर्धा भाग दुखतो. परंतु काहीवेळा संपूर्ण डोकेही दुखू लागते. त्यामुळे डोक्यात एवढी तीव्र वेदना (pain) होते की डोक्यात हातोडा मारल्यासारखा भास होतो. ही वेदना काही तासांपासून काही दिवसांपर्यंत टिकू शकते. मायग्रेनच्या या वेदनेमध्ये डोक्‍याच्या खाली असलेली धमनी मोठी होते आणि कधी-कधी वेदनादायक भागाला सूज येते. डॉक्टरांच्या मते, मेंदूच्या (Brain) किंवा चेहऱ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्याने मायग्रेन होतो. मायग्रेन हा देखील एक अनुवांशिक आजार आहे, जो खाण्याच्या सवयी, वातावरणातील बदल, तणाव, निद्रानाश किंवा जास्त झोपेशी संबंधित असू शकतो.

मायग्रेनची लक्षणे (Symptoms of Migraine)-

1. डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना

2. मोठा आवाज आणि प्रकाश सहन न होणे किंवा डोकेदुखी

3. मळमळ

4. उलट्या होणे

मायग्रेनवरचे घरगुती उपाय (Home remedies For Migraine)-

1. डोक्याची मालिश (Head massage)-

जेव्हा मायग्रेनचा त्रास सुरू होतो तेव्हा तुम्ही डोक्याची मालिश करू शकता. मसाज केल्याने डोक्यात रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढते, ज्यामुळे दुखण्यातून आराम मिळतो. यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता. लक्षात ठेवा किमान 20 मिनिटे मसाज करा.

2. आल्याचा वापर (Ginger)-

मायग्रेनच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आले फायदेशीर ठरते. मायग्रेनमध्ये त्रासदायक असलेल्या मळमळ, उलट्यामध्ये आराम देण्याचे काम आल्याचे औषधी गुणधर्म करतात. याव्यतिरिक्त यामुळे डोकेदुखी देखील कमी होते. यासाठी एक इंच आलं घेऊन ते एका ग्लास पाण्यात उकळा. यानंतर ते गाळून थंड करून त्यात लिंबू टाकून प्या.

3. कॉफी (Coffee) -

कॉफीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे मायग्रेनचा तीव्र वेदना लगेच कमी होतो. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम देते. यासाठी ब्लॅक कॉफी प्यावी.

4. धने चहा (Cilantro Tea)-

धनेदेखील डोकेदुखीमध्ये आराम देण्यास उपयुक्त आहे. विशेषतः, मायग्रेनसाठी ते खूप प्रभावी मानले गेले आहे. यासाठी धने पाण्यात उकळून प्या. यामुळे तुम्हाला दुखण्यात त्वरित आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT