health-children-.jpg 
health-fitness-wellness

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे?...मग 'हे' तर केलंच पाहिजे..

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना सकस व पौष्टिक आहार देणे योग्य ठरेल. पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील गोष्टी नक्कीच फायद्याच्या ठरतील...

बाहेरचे जंक फूड खाणे टाळा

लहान मुलांना दिवसातून एकदा सकाळी मोरावळा दिल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सुकामेवा, कडधान्य (ई जीवनसत्त्व) गाजर आणि रताळी (ए जीवनसत्त्व), कच्चा लसूण (ए आणि ई जीवनसत्त्व) रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा उपयुक्त आहे. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर आवळा उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. आवळ्याचा रस, पूड, वाळलेले आवळे, च्यवनप्राश, मोरावळा हे गुणकारी आहे. रोज सकाळी आवळ्याचा रस अथवा चूर्ण मधातून घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात. तसेच तळलेले व मैद्याचे पदार्थ, बाहेरचे जंक फूड खाणे टाळले पाहिजे. पचनशक्ती वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करायला हवा. इडली, डोसा यांचा आहारात समावेश करायला हवा. 

गूळ गोळी 

लिंबूवर्गीय (सी जीवनसत्त्व) फळांमध्ये रोगप्रतिकारक पेशी सक्षम करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे सी जीवनसत्त्व असणाऱ्या फळांचाही आहारात समावेश असावा. गूळ गोळी रोज एक दुपारच्या आणि एक रात्रीच्या जेवणानंतर देणे. एकचतुर्थांश चमचा प्रत्येकी हिंग, काळे मीठ, ओवा, सुंठ, मिरपूड आणि दोन चमचा गूळ, दोन चमचा तूप घेणे. हे सर्व साहित्य एकत्र मळून छोटी गोळी बनवायची. फळांमध्ये केळी, सफरचंद, डाळिंबाचा समावेश करावा.  

पाणी पिण्याचे प्रमाण कमी असेल, तर शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करावे. मुलांचे वजन ३० किलो असल्यास वजनाच्या अर्ध्या म्हणजेच १५ दशांश अर्थात, दीड लिटर पाणी आवश्‍यक असते. रात्री झोपताना एकचतुर्थांश चमचा अश्‍वगंधा पावडर, अर्धा चमचा तूप, एक ते दोन खडे गूळ, एक कप कोमट दुधासह देणे. - रश्मी सोमाणी, एमएसआरडी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT