Viagra esakal
health-fitness-wellness

व्हायग्राबद्दल नवीन माहिती! अभ्यासातून आले आश्चर्यकारक निष्कर्ष

व्हायग्रा घेतलेल्या तरुणांना अल्झायमर होण्याची शक्यता 69 टक्के कमी आहे जे औषध वापरत नाहीत.

सकाऴ वृत्तसेवा

व्हायग्रा घेतलेल्या तरुणांना अल्झायमर होण्याची शक्यता 69 टक्के कमी आहे जे औषध वापरत नाहीत.

अमेरिकन शास्त्रज्ञांनी व्हायग्राच्या (Viagra) फायद्यांबाबत नवीन माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, व्हायग्रा घेतल्याने केवळ नपुंसकत्वाचा फायदा (The benefits of impotence) होत नाही तर अल्झायमरचा (Alzheimers) धोकाही कमी होतो. अमेरिकेतील क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधकांनी सहा वर्षांपर्यंत 7 मिलीयन अमेरिकन लोकांची मेडिकल डेटाची तपासणी केली आणि त्यांचा मागोवा घेतला. परिणामांवरून असे दिसून आले की व्हायग्रा (Viagra)घेतलेल्या तरुणांना अल्झायमर होण्याची शक्यता 69 टक्के कमी आहे जे औषध वापरत नाहीत.

हे कसे काम करते?

शास्त्रज्ञांच्या मते, नपुंसकत्व (Impotence)आणि उच्च रक्तदाबाच्या (High blood pressure)उपचारांमध्ये वापरला जाणारा सिल्डेनाफिल (Sildenafil) अल्झायमरच्या विरूद्ध देखील प्रभावी आहे. प्रमुख संशोधक डॉ. फीक्सियांग चेंग यांनी सांगितले की, हे औषध अल्झायमर टाळू शकते, परंतु ते अल्झायमर बरा करू शकते की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु वेगवेगळ्या प्रयोगशाळेतील संशोधनातून असे आढळून आले की, ते मेंदूच्या पेशींची वाढ (Growth of brain cells) वाढवू शकते आणि मेंदूमध्ये हानिकारक प्रथिने (Harmful proteins) तयार होण्यास प्रतिबंध करू शकते.

अल्झायमर (Alzheimers) बनत चालली ही एक मोठी समस्या

आजच्या युगात अल्झायमर ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. ब्रिटेनमधील अर्ध्या दशलक्षाहून अधिक लोकांना याचा त्रास होतोय. 2040 पर्यंत हा आकडा 1.6 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यूएस मध्ये, 6 दशलक्षाहून अधिक लोकांना अल्झायमर आहे, जेथे पुढील 20 वर्षांत दर दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सध्या यावर कोणताही इलाज नाही पण काही सुधारण्यासाठी औषधे आहेत.

अल्झायमरची कारणं (Causes of Alzheimers)

काही लोकांना अल्झायमर का होतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु अनुवांशिक घटक (Genetic factors), धूम्रपान (Smoking) आणि जास्त वजन (Over weight) ही मुख्य कारणे आहेत. अल्झायमर रोग असलेल्या रुग्णांमध्ये मेंदूतील ब्लर्ड सर्कुलेशन (Blurred circulation) देखील कमी होते, ज्यामुळे चेतापेशी (Neuron) मरतात. सिल्डेनाफिल हे रक्तवाहिन्या (Blood vessels) विस्तृत करण्यासाठी आणि जननेंद्रियांमध्ये रक्त परिसंचरण (Blurred circulation) वाढवण्यासाठी ओळखले जाते, तज्ञांचा असा विश्वास आहे की ते मेंदूमध्ये रक्त परिसंचरण (Blurred circulation) देखील सुधारू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT