COVID 19 Jn.1 Variant : कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या उपप्रकाराचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे. अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळला नसला तरी दक्षता म्हणून रुग्णालयात शंभर बेड सज्ज आहेत.
पूर्ण रुग्णालयात ४५० बेड आहे. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल, अशी व्यवस्था आहे. (no JN 1 corona patients in district jalgaon news)
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे दिसताच, जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, मास्क लावावा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.
केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली. ही महिला आता पूर्णपणे बरी आहे. ‘जेएन १’चा देशातील दुसरा रुग्ण महाराष्ट्रात आढळला असून, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या नागरिकांमध्ये अधिक भीती आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सज्ज झाले आहे. रुग्णालयात ४५० बेड आहे. त्या सर्व बेडपर्यंत ऑक्सिजनची पाइपलाइन गेली आहे. ऑक्सिजन प्लान्ट, लिक्विड प्लान्ट, ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट, ड्यूरा सिलिंडर तयार आहेत.
ही घ्या काळजी...
ज्यांना कोरोनाची लक्षण दिसत असतील त्यांनी गरजेच्या ठिकाणी मास्क घालावा. वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टनसिंग पाळावे, गर्दीत जाणे टाळावे आदींचे पालन करावे. ‘जेएन १’ या उपप्रकाराची सौम्य लक्षणे आढळून येतात. त्याची भीती बाळगू नये; मात्र कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन डीन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.