file photo 
health-fitness-wellness

प्रोटीन मिळवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ; विसरा चिकन, मटण व अंडी

नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोनाने प्रत्येकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. कधी आपल्याला कोरोनाची लागण होईल आणि मृत्यू होईल अशी भीती सतावत आहे. सद्या कोरोनावार मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी सह चिकन आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे अंडी आणि चिकनच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. दुसरा पर्याय नसल्याने नागरिक हे घेत आहे. मात्र, अशा दहा वस्तू आहेत ज्यामध्ये अंडे आणि चिकनपेक्षा जास्त ताकद आणि प्रोटीन आहेत... (Eat-this-food-to-get-protein;-Forget-chicken,-mutton-and-eggs)

शुद्ध शाकाहारी लोकांची मोठी अडचण होत आहे. ते अंडी आणि चिकन खास नसल्याने भीती वाटत आहे. मात्र, घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशा लोकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत खालील गोष्टी. त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य सांभाळण्यास मदतही होते.

ब्रोकोली

ब्रोकोली जीवनसत्व सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रथिनेयुक्त अशी एक आरोग्यदायक भाजी आहे. ब्रोकोली ही विविध बायोएक्टिव्ह पोषक तत्वांचा संग्रह आहे. जी कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. त्यात इतर भाज्यांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात प्रोटीन आहेत. म्हणजे चिरलेल्या ब्रोकोलीच्या ९६ ग्रॅममध्ये तीन ग्रॅम पप्रोटीन असू शकतात. ज्यामध्ये केवळ ३१ कॅलरी असतात.

भिजवलेला हरभरा-चणे

शंभर ग्रॅम भिजवलेल्या हरभरा खाल्ल्याने शरीराला पन्नास ग्रॅम प्रोटीन मिळाते जे चिकनपेक्षा दुप्पट आहे. आता लोकांना कोण समजावणार की यात चिकनपेक्षा जवळपास दुप्पट प्रोटीन आहे. म्हणून सकाळी भिजवलेला हरभरा रिकाम्या पोटी खावा.

पनीर

पनीरमध्ये काही अंशी फॅट आणि कॅलरीचा समावेश असतो. परंतु, त्यात प्रोटीन भरपूर असतात. याशिवाय हे कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम व्हिटॅमिन बी १२, राइबोफ्लेविन आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहे. २२६ ग्रॅम चीजच्या कपात १९४ कॅलरीसह २७ ग्रॅम प्रोटीन असू शकतात.

क्विनोआ

क्विनोआचे बिज सध्या जगातील सर्वात लोकप्रिय सुपर फूड पदार्थांपैकी एक आहे. हे बऱ्याच जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे मुख्य स्त्रोत आहे. तसेत त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा साठा आहे. शिजवलेल्या क्विनोआच्या एका कपात २२ ग्रॅम कॅलरीचे १८५ ग्रॅम आणि ८ ग्रॅम प्रोटीन असतात.

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतात. शंभर शेंगदाण्यांमध्ये २४ ग्रॅम प्रोटीन आढळतात. शंभर ग्रॅम कोंबडीमध्ये केवळ १५ ते १६ ग्रॅम प्रोटीन आढळतात. आता आपण अशी तुलना करू शकतो की अधिक शक्तिशाली काय आहे मांस की शेंगदाणे.

बदाम

सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन केल्याने शरीरात भरपूर प्रोटीन व इतर पौष्टिक पदार्थ मिळतात. ज्यामुळे शरीर मजबूत बनते.

ओट्स

काही वर्षांपासून ओट्सच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात केवळ प्रोटीनच नव्हे तर निरोगी फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीझ, थायमिन, व्हिटॅमिन बी एक आणि बऱ्याच गोष्टींचे पोषक घटक देखील आहेत. अर्ध्या कप कच्च्या बार्लीमध्ये १३ ग्रॅम प्रथिने असतात ज्यात ३०३ कॅलरी असते.

ग्रीक योगर्ट

ग्रीक दही एक प्रकारचे दही आहे. ते चविष्ट आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. फॅट नसलेल्या ग्रीक दह्यामध्ये ४८ टक्के प्रोटीन असतात. जर आपण असे गृहित धरले की १७० ग्रॅममध्ये १७ ग्रॅम प्रोटीन आहेत. ज्यामध्ये केवळ शंभर कॅलरी असतात. म्हणूनच हे दही प्रोटीनसाठी एक उत्तम उपाय आहे.

राजमा

राजमा प्रोटीनने समृद्ध आहे. राजमाची भाजी, राजमा सूप पिल्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कोंबडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. म्हणजेच या गोष्टींचे नियमित सेवन करून तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

(Eat-this-food-to-get-protein;-Forget-chicken,-mutton-and-eggs)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT