जगातील विमान कंपन्यांच्या सर्वोच्च वैद्यकीय सल्लागाराच्या (top medical adviser to the world’s airlines ) म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिअंट आल्यापासून विमान प्रवाशांना विमानामध्ये प्रवासादरम्यान दरम्यान कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट झाली आहे.
नवीन स्ट्रेन हा अत्यंत संक्रमक आहे आणि काही आठवड्यांत प्रबळ झाला आहे. फक्त यूएसमध्ये सर्व नवीन केसेसपैकी 70% पेक्षा जास्त केस ओमीक्रॉनच्या आहे. अॅडवान्स पॅसेंजर जेट्सवरील हॉस्पिटल-ग्रेड एअर फिल्टर्समुळे जमिनीवरील शॉपिंग मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणांपेक्षा विमानांमध्ये संक्रमणाचा धोका खूपच कमी होतो. पण जस जसे अधिक प्रवासी वर्षाअखेर सुट्टीसाठी कुटुंबासह विमानाने प्रवास करत आहे तसा हा ओमिक्रॉन झपाट्याने पसरत आहे (Omicron may double risk of getting infected on planes IATA says)
जगभरातील जवळपास ३०० वाहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे ( International Air Transport Association- IATA) फिजिशियन (physician)आणि वैद्यकीय सल्लागार (medical adviser)डेव्हिड पॉवेल म्हणाले की, ''अधिक क्षमतेने भरलेल्या इकॉनॉमी केबिनपेक्षा बिझनेस क्लास हा अधिक सुरक्षित असू शकतो. पूर्वीप्रमाणेच, प्रवाशांनी प्रत्यक्ष संपर्क टाळावा आणि वारंवार पृष्ठभागाला स्पर्श टाळावा आणि एकमेकांच्या जवळ बसलेल्या लोकांनी जेवणाच्या वेळी एकाच वेळी मास्क न काढण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
"ज्याप्रमाणे सुपरमार्केटमध्ये जाण्याचा किंवा बसने प्रवास करण्याचा धोका वाढला आहे त्याचप्रमाणे विमान प्रवासातही तुलनात्मक धोका कदाचित वाढला आहे, "
एअर न्यूझीलंड लिमिटेडचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉवेल यांनी मंगळवारी 'ब्लूमबर्ग न्यूज'शी साथीच्या आजारादरम्यान विमान प्रवासाबाबत बोलले. त्यासंबधी खाली थोडक्यात माहिती दिली आहे.
आम्ही इतर वातावरणात पाहिल्याप्रमाणे, डेल्टासंबधीत कोणताही धोका असला तरी, ओमिक्रॉनमध्ये तो धोका दोन ते तीन पट जास्त असेल असे गृहीत धरावे लागेल. कितीही कमी जोखीम असली तरी -विमान प्रवासात ती जोखीम काय असेल हे आम्हाला माहित नाही.
सामान्य किंवा पृष्ठभागाला स्पर्श टाळा, शक्य असेल तेव्हा हात स्वच्छ करा, मास्क,सोशल डिस्टंसिंग पाळा, नियंत्रित-बोर्डिंग प्रक्रिया, इतर ग्राहकांशी थेट संपर्क टाळण्याचा प्रयत्न करा, फ्लाइटमध्ये खरच गरज असल्याशिवाय जेवताना किंवा पेय घेताना शक्यतो एकावेळी मास्क काढणे टाळण्याचा प्रयत्न करा. ओमिक्रॉनमुळे ज्याप्रमाणे सुपरमार्केटमध्ये जाण्याचा किंवा बसने प्रवास करण्याचा तसाच तुलनात्मक धोका विमान प्रवासातही कदाचित वाढला आहे.
दोन तासांच्या विमान प्रवासादरम्यान‘फक्त आपला मास्क संपूर्ण वेळेवर ठेवा’ असे म्हणणे खूपच सोपे आहे. परंतु जर ज्यांचे 10 तासांचा प्रवास आहे त्यांचे काय? अशा लोकांना खाऊ-पिऊ नका असे सांगणे खूपच अवास्तव आहे. बहुतेक एअरलाइन्स जे करत आहेत ते उत्साहवर्धक आहे, परंतु ते आग्रह धरत नाही की प्रवाशांनी त्यांच्या मास्क-ऑफ पीरियड्सला थोडेसा असावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सोप्या भाषेत सांगायचे तर, मास्क घातलेल्या दोन लोकांचे एकाकडून दुसर्याकडे संक्रमण कमीतकमी असते. जर तुमच्यापैकी एकाने तुमचा मास्क काढून टाकला, तर त्या व्यक्तीला संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो, परंतु जर तुम्ही दोघांनी काढले तर स्पष्ट आहे कोणताही अडथळा नसल्यामुळे तुम्ही सहज एकमेकांना संक्रमण प्रसारित करू शकता.
तुम्ही स्वतःला देऊ शकणारे सर्वात मोठे संरक्षण म्हणजे लसीकरण आणि बुस्टर तुम्ही स्वत:ला अतिरिक्त मास्क किंवा वेगळ्या प्रकारच्या मास्कपासून किंवा विमान प्रवास न करता जे संरक्षण देता, ते अर्थातच लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळणारे संरक्षणापेक्षा कमी आहे.
संशोधनातू असे दिसू आले आहे की लसीचा एक डोस झाला असल्यास तुम्हाला ओमीक्रॉनचा संसर्ग होत नाही. त्यामुळे ओमिक्रॉन विरूद्ध दोन डोस हे डेल्टाविरूद्ध एका डोससारखेच संरक्षण आहे. हे हार्ड सायन्समध्ये इस्टॅब्लिश झाले नाही, परंतु अभ्यासात जे समोर येत आहे त्याच्याशी संबंध जोडणे कठीण वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.