पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) आई हिराबेन यांचं शुक्रवारी पहाटे अहमदाबादच्या रुग्णालयात निधन झालं.
Heeraben Modi Demise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) आई हिराबेन यांचं शुक्रवारी पहाटे अहमदाबादच्या रुग्णालयात निधन झालं. हिराबेन 100 वर्षांच्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन (Heeraben Modi) यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन पंचतत्त्वात विलीन झाल्या. पीएम मोदींनी त्यांच्या भावासोबत आईला मुखाग्नी दिली.
याचवर्षी 18 जून रोजी त्यांनी आपला 99 वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या या टप्प्यावरही हिराबेन पूर्णपणे निरोगी होत्या. त्या धाकटा मुलगा पंकज मोदींसोबत गांधीनगरमध्ये राहत होत्या. पण, घरातील सर्व कामं त्या स्वतःच करत होत्या. या वयातही त्यांच्या तब्येतीचं रहस्य काय होतं, ते आपण जाणून घेऊ..
हिराबेन यांना घरचं जेवण खूप आवडायचं. त्या बहुतेक घरचंच जेवण जेवायच्या. त्यांना खिचडी, डाळ, भात अशा गोष्टी जास्त आवडायच्या. मिठाईत त्यांना लापसी खूप आवडायची. जेव्हा-जेव्हा पंतप्रधान मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतं, तेव्हा हिराबेन साखर कँडी आणि लापसीनं त्याचं तोंड गोड करत असतं. पंतप्रधान मोदी जेव्हा-जेव्हा आपल्या आईसोबत जेवायचे, तेव्हा ते नेहमी साधं जेवण खाणं पसंत करायचे.
अहमदाबादच्या एका आहारतज्ज्ञाच्या मते, या वयातही हिराबेन यांच्या आजाराची फारशी बातमी नव्हती. त्यांची प्रकृती सामान्य माणसांपेक्षा खूप चांगली होती. साधं अन्न हे निरोगी आयुष्याचं लक्षण आहे. त्यांनी नेहमी घरात बनवलेल्या अन्नासह साध्या अन्नाला प्राधान्य दिलं. हिराबेन यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणानं व्यतीत केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.