pumpkin seed 
health-fitness-wellness

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बिया शरीरासाठी फायद्याच्या

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे: Pumpkin Seeds Health Benefits: काही लोकांना भोपळ्याची चव आवडत नाही, पण भोपळ्याच्या बिया बऱ्याच जणांना आवडतात. विविध प्रकारचे गोड पदार्थ आणि नाश्ता बनवण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो. आजही खेड्यांमध्ये लोकांच्या आहारात भोपळ्याच्या बिया दिसून येतात. 

व्हिटॅमिन ई आणि झिंकचा मोठा स्रोत-
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता कमी होण्यास मदत होते. या बिया खाल्ल्याने शरीरातील व्हिटमिन ई चे प्रमाण वाढते. व्हिटमिन ई तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी मोठी मदत करते.

तसेच व्हिटोमिन ई आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. भोपळ्याच्या बियांच्या सेवनाने रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी चांगली राहिली तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते. यामुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा शरीरावर होणारा परिणाम कमी होतो. आपली चव आणि गंध ओळखण्याची क्षमता टिकवून ठेवण्याचे काम झिंक करत असते. शरीरात जर झिंकची कमतरता असेल व्यक्तीच्या दृष्टी, चव आणि गंध घेण्याची क्षमता कमी होते.

शरीराची झालेली जखम लवकर बरी होण्यासाठी झिंक काम करत असते. तसेच पिंपल्स, फोड आणि त्वचेशी संबंधित विविध आजारांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे इतक्या समस्यांवर उपयोगी असणाऱ्या भोपळ्याच्या बिया वापरणे टाळणे आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकेल.

फ्रि रॅडिकल्सवर नियंत्रण-
-शरीरातील फ्रि रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिटामिन ई काम करत असते. जेणेकरून हे फ्रि रॅडिकल्सवर शरीराच्या निरोगी पेशींना नुकसान पोहचवू शकणार नाहीत.
-फ्रि रॅडिकल्स पचनाच्या दरम्यान अनेक प्रक्रियांच्या वेळी रेणूंच्या विघटनामुळे तयार होत असतात. ते शरीराच्या आत मुक्तपणे फिरतात आणि निरोगी पेशींना हानी पोहोचवतात. फ्रि रॅडिकल्स रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी व्हिटमिन-ई काम करते. 

भोपळ्याच्या बिया सेवन केल्याचे फायदे-
-फंगल इनफेक्शन कमी करण्यास फायदा होतो.
-याचा फायदा शरीरातील धोकादायक मायक्रोब्सवर परिणामकारक
-या बियांच्या सेवनाने जखम भरण्यास मदत होते.
-ऍलर्जी कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT