health-fitness-wellness

कोणते पदार्थ कच्चे खावे आणि का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नीलेश डाखोरे

नागपूर : कोणतेही अन्न व्यवस्थित शिजवूनच खाल्ले पाहिजे. कारण, कच्चे अन्न खाल्याने पचायला जड जाते. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्‍भवू शकतात. मात्र, आहारात असे काही पदार्थ आहेत जे कच्चे खाल्याने शरीराला अधिक पोषक मिळते. यात फळ, भाज्या, ड्राय फ्रुट्स, कडधान्य यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये अनेक पौष्टिक घटकही असतात.

कोणत्याही कडधान्याला मोड येण्याची प्रक्रिया ही त्यातील पोषण मूल्य अनेक पटींनी वाढवते. त्यातही मोड आलेली कडधान्य कच्ची खाल्ली तर शरीराला आश्‍चर्यकारक फायदे होतात. जास्त प्रमाणात उष्णता लागल्याने पदार्थातील व्हिटॅमिन सी नष्ट होतात. तसेच जेवण बनवण्याच्या अन्य पद्धतींमुळे पदार्थातील अनेक व्हिटॅमिन्स नष्ट होतात. तेव्हा मोड आलेली कच्ची कडधान्य खाणे अत्यंत चांगली कल्पना आहे.

फळ शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे कधीही चांगले असते. कारण, फळ शिजवल्यास त्यातील कॅलरीज वाढतात. फळांचा रस पिण्याऐवजी अख्खे फळ खाणे योग्य ठरेल. फळांच्या रसामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल. अन्न शिजवताना त्यात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांवर पदार्थाची पौष्टिकता अवलंबून असते. त्यासाठी आरोग्यदायी पदार्थ कोणते? कोणते पदार्थ शिजवून किंवा कच्चे खावेत. याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

सुका मेवा

भाजलेल्या ड्राय फ्रुट्समध्ये मीठ किंवा साखर मिसळल्याने कॅलरीज वाढतात. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि अन्य ड्राय फ्रुट्स हे मुळत:च अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असतात. परंतु, भाजल्याने त्यातील अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ते कच्चे खाणे कधीही चांगले असते.

बीट

बीट ही लोहाने परिपूर्ण अशी भाजी आहे. सॅलड व ज्यूसच्या स्वरूपात बिटाचे सेवन केले जाते. मात्र, बीट कच्चे खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. व्यायामापूर्वी बीट खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

लसूण

लसूण कच्चे खाणे अनेकांना आवडत नाही. परंतु, कच्च्या लसुणाचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. कच्च्या लसणीचे अनेक औषधी फायदे आहेत. कच्चा लसणीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

कांदा

कांदा हा प्रत्येकाच्या घरी असतो. डाळी, भाज्या, उसळी आणि कालवणांमध्ये कांदा हमखास वापरला जातो. परंतु, कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. याच्या सेवनाने यकृत चांगले मजबूत होतो. कांदा कच्चा खाल्ल्याने अँलिसिन हे हृदयरोग रोखण्यास, हाडांची घनता वाढवण्यास आणि रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.

टोमॅटो

टोमॅटो हा आहाराचा एक भाग आहे. जेवणात विविध पद्धतीने त्याचा वापर होतो. परंतु, टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे शिजवल्यानंतर कमी होतात. त्यामुळे टोमॅटो देखील कच्चे खाणे केव्हाही चांगले असते. त्याचा सॅलडमध्ये समावेश करणे योग्य ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT