स्तनाचा कर्करोग आता लवकर ओळखणे सोपे होणार आहे. यासाठी रक्त तपासणीचा वापर करून निदान केले जाऊ शकते. चैन्नईच्या अद्यार येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटने केलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या निकालांनी हे स्पष्ट झाले आहे. यामुळे लवकर निदान आणि उपचार सुरू करण्यात नक्कीच मदत होणार आहे. पण, आणखी मोठ्या क्लिनिकल चाचण्या घेऊन निष्कर्ष काढणेही गरजेचे आहे.कारण या रक्त चाचण्या या मॅमोग्राम आणि शारीरिक तपासणी बदलू शकत नाहीत.
याविषयी शास्त्रज्ञांनी माहिती दिली, ते म्हणाले की, ही रक्त चाचणी महिलांच्या प्लाझ्मामधून काढलेल्या सेल-फ्री डीएनएमधून तीन जीन मार्कर शोधून कर्करोगाच्या सर्व अवस्था ओळखते, ज्यामध्ये कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे नलिकांमध्ये (नॉन-इनवेसिव्ह) बंदिस्त असताना दिसून येतो. अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मोलेक्युलर ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ थंगाराजन राजकुमार म्हणाले की, स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये प्रमोटर मिथिलेशन या यंत्रणेमध्ये SOSTDC1, WIF1 आणि DACT2 या तीन संरक्षणात्मक जनुकांच्या कार्यशैलीत घट होते. जेव्हा चाचणीतून जनुकांमध्ये जास्त प्रमाणात मिथिलेशन असल्याचे निश्चित केले जाते तेव्हा कर्करोगाचे निष्कर्ष सकारात्मक येतात, असेही त्यांनी सांगितले.
असा केला अभ्यास
आमच्या अभ्यासात स्तनाचा कर्करोग असलेल्या सर्व महिलांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १०० पैकी ९ महिलांना पॉझिटिव्ह म्हणता येईल पण त्यांना निगेटिव्ह घोषित करण्यापूर्वी आणखी चाचण्यांची गरज असू शकते. महत्वाचे म्हणजे या महिलांची संवेदनशीलता १०० टक्के होती, असे त्यांनी सांगितले. हा अभ्यास कर्करोगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समस्याग्रस्त असलेल्या २१८ महिलांवर ((नॉन-इनवेसिव्हसह), २४० निरोगी महिला आणि कर्करोग नसलेल्या पण ट्यूमर असलेल्या महिलांवर करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. याविषयी डॉ. राजकुमार म्हणाले, या चाचणीमुळे किमान १६ महिलांना सुरूवातीच्या टप्प्याचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यांचाही शोध यामुळे घेता आला. अशाप्रकारे रक्तचाचणी केल्याचा मोठा फायदा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.