भारतीय अध्यात्म चैतन्याची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या स्त्री-पुरुषांचे एक समृद्ध मिश्रण आहे. आंतरिक स्वरूपाचा प्रश्न येतो, तेव्हा स्त्रिया पुराषांइतक्याच सक्षम आहेत. फक्त त्वचा आणि शरीर, ज्याला आपण पुरुष किंवा एक स्त्री म्हणून संबोधता; पण जे काही आंतरिक आहे ते एक सामन आहे. फक्त त्वचा एखाद्याचे आध्यात्मिक कौशल्य नाही ठरवू शकत. अगदी वैदिक काळापासून इथे पुष्कळ महिला होऊन गेल्या, ज्यांनी चैतन्याची सर्वोच्च पातळी गाठली.
जुन्या काळामध्ये, स्त्रियासुद्धा पवित्र धागा, अर्थात जानवे घालायच्या, कारण त्याशिवाय त्या धर्मग्रंथ वाचू शकत नसत. पुरुषांप्रमाणे, त्यांनाही विवाह बंधनात १० ते २० वर्षे राहता येत असे आणि त्यांना आध्यात्मिकतेची खूप ओढ वाटू लागली, की त्या त्यांच्या कुटुंबाचा त्याग करू शकत होत्या. पण, जेव्हा क्रूर बाह्य आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा महिलांनी हळूहळू त्यांचे स्वातंत्र्य गमावले, नियम बदलू लागले. कदाचित ते काही काळासाठी गरजेचे होते. कारण भौतिक परिस्थिती अशी होतीस की स्त्रियांना प्रतिबंधित जागेमध्ये त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवावे लागत होते, पण दुर्दैवाने त्याचे रूपांतर कायद्यामध्ये झाले. वेदांमध्ये सर्वांत पहिली अधोगतीच ही झाली, की त्यांना जानवे घालणे नाकारण्यात आले. हेही सांगितले गेले, की तिच्या पतीची सेवा हेच एकमेव तिच्या मुक्तीचे किंवा तिचे परम स्वरूप साध्य करण्याचा मार्ग आहे. आणि हा नियम केला गेला, की केवळ पुरुषच संन्यास घेण्यासाठी पात्र आहेत.
दुर्दैवाने, हे आजही असेच चालू आहे. एका स्त्रीला फक्त एकच सांगण्यात आले, की तिचा जन्म फक्त तिच्या वडिलांची किंवा तिच्या पतीची सेवा करण्यासाठी आहे. जे लोक अद्वैत, अस्तित्वाच्या अद्वैताबद्दल बोलतात, त्यांनी हे शिकवले, ‘सर्वकाही एकच आहे, पण स्त्रिया कमी आहेत..” जरी त्यांना हे माहीत होते, की त्यांचे अस्तित्व तिच्यावर अवलंबून आहे. तो तिला स्वीकारू नाही शकत, तर त्याने सृष्टीतील सगळे द्वैत स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उच्च किंवा नीच यांचा प्रश्न हा फक्त पूर्वग्रहाने दूषित मनाला येतो. हा फक्त दोन गुणांचा प्रश्न आहे. जर एक पुरुष जो स्त्रीच्या गर्भातून जन्माला आला आहे, आणि ती जर निकृष्ट असेल तर पुरुष कसा काय श्रेष्ठ? अशी शक्यता निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. ही वैश्विक अडचण आहे. हा केवळ एका अडाणी माणसाने केलेला विचार आहे, असे नाही. हा पुरुषांचा जगण्याचा मार्ग झालेला आहे, त्याची संस्कृती आणि धर्माचा एक भाग बनलेला आहे.
एकदा एक समाज सुधारक विवेकानंदांकडे गेले आणि त्यांनी विचारले, ‘‘तुम्हीही स्त्रियांना साथ दिलीत हे चांगले आहे, मी काय करावे? मला त्यांची सुधारणा करायची आहे. मला याचे समर्थन करायचे आहे ’’ विवेकानंद म्हणाले, ‘‘थांबा, तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही करण्याची गरज नाही; त्यांना फक्त एकटे सोडा. त्यांना जे करायचे आहे ते त्या करतील.’’ याचीच आज आपल्याला गरज आहे. असे नाही, की पुरुषाने स्त्रीला सुधारण्याची गरज आहे. जर त्याने तिला फक्त वाव दिल्यास ती जे गरजेचे आहे ते करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.