Sanitary Pads Were Made For Men Not For Women : सॅनिटरी पॅड्स आणि पाळी असं अविभाज्य समिकरण हल्लीच्या काळात झालं आहे. महिलांच्या पाळीच्या काळात पूर्वी कापड वापरलं जात असे. पण ते अस्वच्छ कापड महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू लागलं. कापड वापरल्याने महिलांमध्ये अनेक आजार वाढू लागले.
त्यामुळे महिलांनी पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडच वापरावे असा सल्ला आरोग्य यंत्रणा आणि डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळे हल्ली पॅड म्हटलं की ही वस्तू महिलांसाठी आहे म्हणून पुरूष त्याकडे वेगळ्याच अवघडलेपणाने बघतात.
पण तुम्हाला माहितीये का की, मुळात या पॅडची निर्मिती महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी झाली होती. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या.
सॅनटरी पॅडचा पहिल्यांदा वापर
मीडिया रिपोर्टद्वारे उपलब्ध माहितीनुसार सॅनिटरी पॅडचा पहिल्यांदा वापर पहिल्या महायुद्धा दरम्यान म्हणजे १९१४ मध्ये करण्यात आला होता.
या युद्धा दरम्यान जखमी झालेल्या सैनिकांसाठी फ्रांसमध्ये काम करणाऱ्या अमेरिकी परिचारीकांनी केला होता.
जखमी सैनिकांमध्ये जास्त रक्तस्राव होऊ नये म्हणून सॅनिटरी पॅटचा वापर कराण्यात आला.
त्यावेळी हा नॅपकीन अशा प्रकारे बनवण्यात आला होता की, दुखापत झाली की, जास्तीत जास्त रक्त शोषून घेऊ शकेल.
सॅनटरी पॅडचा शोध
हे नॅपकीन बेंजामिन फ्रँकलिनच्या शोधापासून प्रेरीत होते. आणि मोठ्या प्रमाणात रक्त शोशल्यानंतर ते सहजपणे काढता येतील याची काळजी घेण्यात आली होती.
मासिक पाळीसाठी वापर
युद्धानंतर फ्रांसमध्ये काम करणाऱ्या या अमेरिकन परिचारीकांनी मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्राव शाषून घेण्यासाठी या नॅपकीनचा वापर सुरू केला.
यानंतर हे पॅड्स मोठ्याप्रमाणात बनवले जाऊ लागले आणि महिलांनी पाळीच्या काळात ते वापरण्यास सुरूवात केली.
पाळी दरम्यान रक्तस्राव शोषून घेण्यासाठी आणि वैयक्तीक स्वच्छतेसाठी ते फार फायदेशीर ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.