husbandwife 
health-fitness-wellness

हे आहे वैवाहिक सौख्याचे सातवे सूत्र

डॉ. संजय देशपांडे लैंगिक विकारतज्ज्ञ, नागपूर

प्रणय म्हणजे फक्त सेक्‍स असं आपण म्हणू शकत नाही. आधी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम होतं, मग लग्न होतं (भारतीय प्रथेत याच्या उलट असते, आधी लग्न होते आणि मग प्रेम होणे सुरू होते) आणि मग शारीरिक संभोग होतो. आजकाल बऱ्याच लोकांचे लग्नापूर्वी शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ लागले आहेत. मुला-मुलींचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असे नाते समाजात हळूहळू स्वीकारल्या जाऊ लागले आहेत. मात्र, त्यावर बोलणे टाळले जाते पण बऱ्याचदा या नात्यात शारीरिक संबंधही असतात. एकूणच लैंगिक संबंध हा प्रणयाचा अविभाज्य घटक आहे.

गेल्या भागांमध्ये वैवाहिक सौख्याचे जी सहा सूत्रे बघितली, ते जर मजबूत असतील तर त्या सगळ्यांचा कळस, म्हणजे शारीरिक संभोग गाठता येतो. विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व संबंधांमध्ये वैवाहिक सौख्याची विविध सूत्रे कितपत उपयोगी ठरतील, हे सांगू शकत नाही. मात्र, परस्पर वैयक्तिक संबंधांवरदेखील संभोगातील आनंद आणि अत्युच्च पातळी अवलंबून राहते. आपण सध्या संभोग या सूत्राची चर्चा वैवाहिक संबंधांच्या अनुषंगानेच करणार आहोत. नंतर आपण संभोगादरम्यान उद्भवणाऱ्या समस्या, पुरुषांच्या व स्त्रियांच्या समस्या आणि अन्य आजारांमुळे उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या यावर चर्चा करणार आहोत.

संभोग म्हणजे शारीरिक अवयवांचा समागम अथवा मीलन. जेव्हा उद्दिपित झालेले शिस्न/लिंग स्त्रीच्या योनीमार्गात जाते आणि वीर्यस्खलन होते; यास आपण शारीरिक संभोग असे म्हणतो. या संभोगातून दोघांनाही आनंद मिळण्यासाठी शारीरिक संबंधांची इच्छा होणे महत्त्वाचे असते. कारण कुठल्याही स्त्री-पुरुषाला जोपर्यंत शारीरिक संबंधांची इच्छा होणार नाही, तोपर्यंत संबंध करण्यासाठी ते तयारच होणार नाहीत. इच्छा झाली तर ती व्यक्ती त्या संबंधांत पडेल. पण, ही इच्छा होण्याच्या अगोदरसुद्धा एक मानसिक अवस्था असते; ती म्हणजे शारीरिक संबंधात पडण्याची तयारी.

अनेकदा इच्छा असते पण तयारी नसते. उदा. लग्नाअगोदरची स्थिती घेतली तर इच्छा असते पण मानसिक तयारी नसते. जर तयारी असेल आणि इच्छादेखील असेल तर स्त्री-पुरुष शारीरिक संबंधांमध्ये सहभागी होतात. अर्थात यामध्येसुद्धा आपले संस्कार आड येतात. जसे की, पूर्वीच्या काळी लग्नापूर्वी संबंध बनविणे चुकीचं समजल्या जात होते. पण, हल्ली लग्नापूर्वीदेखील संबंध होऊ लागले आहेत. जे या संबंधांमध्ये पडतात, त्यांना आपण योग्यच करतोय असे वाटते. पण, पूर्वीच्या काळी संस्कार एवढे घट्ट होते की, लग्नापूर्वी संबंध करणे चुकीचे वाटत असे. त्यामुळे तशी संधी आली तरी लोक ते टाळत असत. त्यामुळे मानसिक तयारी ही संस्काराने होते.

मी कुणाशी संबंध केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे, कुठल्या जागी केला पाहिजे ही मानसिकता, संस्कारावर अवलंबून असते. त्यामुळे इच्छेच्या अगोदर मानसिक तयारी अनिवार्य आहे.

आपण यापूर्वी वैवाहिक सौख्याची सहा सूत्रे बघितली. त्यांचे व्यवस्थित पालन केले तर संभोगाची मानसिक तयारी होते. अशी संभोगाची तयारी असेल, तर इच्छा वारंवार होऊ शकते. मग शारीरिक संबंधही वारंवार होऊ शकतात. शारीरिक संबंध वारंवार झाल्यास लैंगिक सौख्यदेखील मिळू शकते. त्यामुळे शारीरिक संबंध सुरू करण्यासाठी मानसिक विचारांचा अंतर्भाव फार महत्त्वाचा आहे.

आधुनिक लैंगिक शास्त्राचे जनक मास्टर्स ऍण्ड जॉन्सन या दाम्पत्याने जवळपास तीनशे जोडप्यांचे दहा हजार शारीरिक संभोग प्रयोगशाळेत अभ्यासले. यामध्ये प्रत्येकाच्या शरीरावर संभोगादरम्यान काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला. त्यांच्या हृदयाची गती, तापमान, रक्तदाब आदींचा अभ्यास करून "ह्युमन सेक्‍युअल रिस्पॉन्स सायकल' ही संकल्पना मांडली. त्यांनी यात लैंगिक प्रतिसादाचे चार टप्पे सांगितलेले आहेत.

पहिला टप्पा आहे "एक्‍साईटमेंट' म्हणजे उत्तेजना. दुसरा टप्पा "प्लॅटू फेज' म्हणजे शारीरिक उत्तेजना कायम राहणे, तिसरी "ऑरगॅजम' फेज म्हणजे कामतृप्तीचा आनंद मिळणे. पुरुषामध्ये वीर्यस्खलनामुळे आणि स्त्रीयांमध्ये योनीमार्ग, गर्भाशय अथवा कटीप्रदेशाचे स्नायु आकुंचन अथवा प्रसरण पावल्यामुळे कामतृप्तीचा आनंद होतो. शेवटचा टप्पा रिजॉल्युशन म्हणजे शारीरिक संबंधांमुळे शरीरात जे बदल झाले आहेत, ते पुन्हा पूर्वपदावर येणे. अशा या चार टप्प्यांमध्ये त्यांनी लैंगिक प्रतिसाद स्पष्ट केला आहे.

या संकल्पनेत एक दुरुस्ती सुचविली ती डॉ. हेलेन सिंगर कॅपलान या मानसशास्त्रज्ञाने. तिने "ट्रायफेजिक ह्युमन सेक्‍सुअल रिस्पॉन्स' म्हणजे लैंगिक संबंधाची प्रतिक्रिया तीन टप्प्यात असते असे सांगितले. यात डिजायर, एक्‍साईटमेंट आणि ऑरगॅजम या टप्प्यांचा अंतर्भाव केलेला आहे. सर्वप्रथम मनुष्याला सेक्‍स करण्याची इच्छा होते व प्रणयात रममाण झाल्याने उत्तेजना येते व नंतर कामतृप्ती होते. या दोन्ही चक्रांचे आपापले महत्त्व आहे. या अनुषंगाने विविध लैंगिक समस्यांवर चर्चा करता येते. पुढील भागांपासून आपण त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT