स्वावलंबी होण्यासाठी खूप धैर्य लागतं. आपल्यासाठी दुसरं कुणी नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी केवळ स्वतःवरच अवलंबून राहायचं हे धाडसाचं काम आहे.
स्वावलंबी होण्यासाठी खूप धैर्य लागतं. आपल्यासाठी दुसरं कुणी नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी केवळ स्वतःवरच अवलंबून राहायचं हे धाडसाचं काम आहे. उलट समर्पणासाठी कमी धैर्याची आवश्यकता असते. जो समर्पित होऊ शकत नाही, तो स्वावलंबीसुद्धा होऊ शकत नाही.
समर्पित होण्यासाठी लागणारं धैर्य तुमच्यात नसल्यास मग स्वावलंबी होणेही अशक्यच आहे. मग तुम्ही उगाच वेडेपणा करीत आहात. असं आहे, तुमच्याकडं शंभर रुपयेही नसतील, तर हजार रुपये कसे असणार? थोडंसं भयदेखील स्वावलंबनाला हानिकारक ठरतं. स्वावलंबनामध्ये समर्पणाचाही समावेश असतो. जसे पन्नास रुपयात दहा रुपये असतातच. समर्पण म्हणजे जबाबदाऱ्यांपासून दूर पळणे असा लोकांचा अनेकदा समज होतो; ते लोक मग आपल्या समस्यांसाठी ईश्वरालाच कारणीभूत समजतात. खरे तर सच्चे समर्पण म्हणजे सर्व गोष्टींची पूर्ण जबाबदारी घेणे आहे.
सुसाना : आपण पूर्णपणे समर्पित कसे होऊ शकतो?
श्री श्री: आधी जबाबदारी घ्या आणि मग मदतीसाठी प्रार्थना करा.
समर्पणाच्या अंतिम पायरीवर संपूर्ण स्वावलंबनच घडते, कारण शेवटी विशाल चैतन्य आत्माच आहे केवळ, इतर काही नाही.
पद्मनाभ : कमळ नाभी
आपल्या शरीरातील विविध अवयव विविध देवांच्या अधिपत्याखाली असतात. सौरप्रतान अथवा सोलार प्लेक्सवर सूर्याचे नियंत्रण असते. सौरप्रतानावर जेव्हा सूर्याचे पहिले किरण पडतात, तेव्हा ते शरीरासाठी चांगले असते. म्हणूनच सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करणे अतियोग्य असते.
सौरप्रतानाचा संपूर्ण मज्जासंस्थेवर खूप मोठा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे दृष्टीचे संवेदनातंतू, पोट आणि आपल्या स्व-जाणीवेवरही त्याचा प्रभाव असतो. सौरप्रतान हे खरेतर शरीरातला दुसरा मेंदू असते. सौरप्रतानाचा आकार साधारणतः बदामाहून थोडा मोठा असतो. मात्र, योगासने, ध्यानसाधना आणि सुदर्शनक्रिया नियमित केल्याने ते मोठे होऊन जर्दाळूएवढे होऊ शकते. असे झाल्याने त्याचे कार्य अधिक प्रभावी होऊन ते शरीरातील नियंत्रण अधिक चांगले करू शकते.
सौरप्रतान जेव्हा आकुंचित होते, तेव्हा दुःख, त्रागा, त्रास आदी नकारात्मक भावना आपल्याला घेरतात. सौरप्रतान प्रसारल्यावर मन स्वच्छ, एककेंद्रित होऊ लागते, मनातील गुंतागुंत सुटू लागते आणि आपली प्रज्ञाशक्ती जागृत होते. कृष्णाला पद्मनाभ म्हटले जाते. म्हणजे ज्याच्या नाभीचा आकार एका कमळाच्या फुलाएवढा आहे. तुम्ही पद्मनाभ झाल्यास तुम्ही अत्यंत सृजनशील व्हाल. सृष्टीचा निर्माता ब्रह्म हा एक पूर्ण फुललेल्या सौरप्रतानातून जन्माला आला, असे म्हणतात.
आजकाल मात्र सौरप्रतान छोटेच राहाते आणि पोट मात्र मोठे होत चालले आहे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.