health-fitness-wellness

PCOD आजारावर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान, हार्मोनल असंतुलन नियमित करण्यात मदत

भाग्यश्री भुवड

मुंबई: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराने पीडित असणाऱ्या महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही. कारण या आजारातून बरं होण्यासाठी स्टेम सेल थेरपी फायदेशीर ठरत आहे. या थेरपीद्वारे हार्मोनल असंतुलन नियमित करण्यात मदत मिळतेय. शिवाय पीसीओएसच्या संबंधित सर्व लक्षणांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे.  मुख्यतः महिलांच्या शरीरातील हॉर्मोनल बदलांमुळे मासिक पाळीही वेळेवर येत आहे.

तरुणींमध्ये 'पीसीओएस' ही एक समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पीसीओएस ही एक अनुवांशिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष (ओव्हरी) असतात जे गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला बीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते आणि त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन आणि एँन्ड्रोजेन या हार्मोनल अंतःस्त्रावांची निर्मितीसुद्धा करते. मात्र, पीसीओएसमध्ये महिलेच्या बीजांडकोषात स्त्रीबीज तयार होते. मात्र हे बीज फुटत नसल्यानं मासिक पाळी येत नाही. अशा स्थितीत ओव्हरीमध्ये छोट्या-छोट्या सिस्ट(गाठी) तयार होतात. अशावेळी महिलेला गर्भधारण करण्यास अडचणी येतात. काही महिलांमध्ये वंधत्वाची समस्याही निर्माण होते.

पीसीओएस या समस्येवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र, आता या आजारातून बरे होण्यासाठी महिलांकरिता आता स्टेम सेल थेरपी वरदान ठरू लागली आहे.
सध्याची तणावग्रस्त जीवनशैली, आहाराच्या अनिश्चित वेळा, धावपळ आणि लठ्ठपणा यामुळेही पीसीओएस ची समस्या उद्भवू शकते.

  • पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस)
  • हार्मोनल डिसऑर्डर: अंडाशयाच्या कामांवर परिणाम होतो
  • अंडाशयाला सूज येणं
  • परिपक्व बीज तयार न होणं
  • अनियमित मासिक पाळी
  • अंगावर व चेहऱ्यावर पुरळ
  • मधुमेहाची समस्या असणं
  • लठ्ठपणा

2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील महिलांपैकी 3.7 % ते 22.5% महिला त्रस्त आहेत. 

पीसीओएस म्हणजे काय?

पीसीओएसमध्ये, अंडाशयात “सिस्ट” असू शकतात आणि शरीरात “नर संप्रेरक” देखील जास्त प्रमाणात होते. याचा परिणाम अनियमित पाळीवर होऊन वंधत्व येऊ शकते. प्रजोत्पादक वयाच्या 10 ते 15 महिलांपैकी एक महिलेमध्ये ही समस्या दिसून येते. अनुवांशिकता, अति-ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह यामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांपैकी शहरात राहणाऱ्या महिलांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. पीसीओएसबद्दल महिलांमध्ये अद्यापही जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे जोवर गर्भधारणेत अडचण येत नाही तोवर याकडे दुर्लक्ष केले जाते.

स्टेम सेल थेरपी औषधावर आधारित थेरपीपेक्षा वेगळे कसे आहे?

“ही उपचारपद्धती आपल्या शरीरात आधीच अस्तित्वात असलेल्या पेशींच्या वापराशी संबंधित आहे. जे वेगवेगळ्या अवयवांचे आणि ऊतींचे कार्य दुरुस्त आणि देखरेखीसाठी कार्य करतात. हे पेशी इतर पेशींची कार्ये अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास उत्तेजित करतात. या थेरपीद्वारे अंडाशयापासून अंडी योग्यप्रकारे विकसित करतो. शरीरातील पेशी, वाढीचे घटक आणि संबंधित पेप्टाइड्स एकत्रितपणे आजार झालेल्या वातावरणास सुधारित करण्यासाठी आणि संतुलित निरोगी झोन तयार करण्यासाठी हे शक्य आहे. या थेरेपीमुळे एंडोमेट्रियम (गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तर) पुनरुत्पादित केले जाऊ शकतात. कारण मेन्स्चिमल पेशी नूतनीकरण करण्यास आणि इतर पेशींच्या प्रकारांमध्ये भिन्नता करण्यास सक्षम असतात.

स्टेम सेल थेरपीद्वारे योगा आणि विशिष्ट व्यायाम यावरही भर दिला जात आहे. एकत्रितपणे करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे निश्चितच मदत मिळतेय. या उपचाराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.

डॉ. प्रदीप महाजन, मेडिसीन रिसर्चर - स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह

----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Stem cell therapy for PCOD is a boon helping to regulate hormonal imbalances

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा केला खात्मा

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT