Exercise Good For Sexual Health esakal
health-fitness-wellness

व्यायामामुळे सुधारते लैंगिक आरोग्य, अभ्यासात स्पष्ट

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, लठ्ठपणा आणि व्यायामाच्या अभावामुळे , 43 टक्के स्त्रिया आणि 31 टक्के पुरुषांचे लैंगिक आरोग्य बिघडलेले आहे

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, लठ्ठपणा आणि व्यायामाच्या अभावामुळे , 43 टक्के स्त्रिया आणि 31 टक्के पुरुषांचे लैंगिक आरोग्य बिघडलेले आहे

व्यायाम करणे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्यायामामुळे शरीराच्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. तंदुरुस्त शरीर, निरोगी मन आणि चांगले जीवन (Lifestyle) जगण्यासाठी व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आठड्यातून किमान दोन ते तीन वेळा जरी व्यायाम केला तरी तुमच्या शारीरिक आरोग्यावर (Health) त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतात. पण लैंगिक आरोग्याचे काय? यासाठी व्यायामाचा (Exercise) कसा फायदा होऊ शकतो? नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आढळून आले आहे की कंबरेचा घेर जास्त असल्यास किंवा BMI जास्त असलेल्या पुरुषांना (Men)इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता 50 टक्के जास्त असते. यात जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लठ्ठ महिलांनी (Women) लैंगिक क्रिया, इच्छेचा अभाव आणि कार्यक्षमतेत येत असलेल्या समस्या नोंदवल्या. 'ओबेसिटी' मध्ये यासंदर्भात प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे वृत्त सीएनएनने प्रकाशित केले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, लठ्ठपणा आणि व्यायामाच्या अभावामुळे , 43 टक्के स्त्रिया आणि 31 टक्के पुरुषांचे लैंगिक आरोग्य (Sex Life)बिघडलेले आहे. ज्या स्त्रिया दर आठवड्याला सहा तास व्यायाम करतात त्यांच्या तुलनेत व्यायाम न करणाऱ्या स्त्रियांमध्ये क्लिटोरल धमन्यांमध्ये लैंगिक त्रास आणि प्रतिकार करण्याचे प्रमाण जास्त असते, असे 2021मध्ये प्रकाशित झालेल्या 'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन' च्या अभ्यासात नमूद केले आहे. तर व्यायाम करणाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती, भावनांचे प्रकटन, उत्तेजना यांची लक्षणीय पातळी उच्च होती. याबाबत लॉस एंजेलिसच्या सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमधील यूरोलॉजिस्ट आणि लैंगिक आरोग्य तज्ञ डॉ. कॅरिन इल्बर म्हणाले, लैंगिक आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. इतर आरोग्य समस्येप्रमाणेच त्याचा सामना केला पाहिजे. पण तरीही अनेक लोकं या विषयावर मोकळेपणाने बोलता येत नाही. सेक्स हा मानवी जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. पती-पत्नीत लैंगिग संबंध चांगले असल्यास त्यांच्यातील मानसिक, भावनिक आरोग्य, जीवनाचा दर्जा आणि नातेसंबंध घट्ट होतात.

Exercise Good For Sexual Health

व्यायाम केल्याने लैंगिक आरोग्य कसे सुधारते?

-एरोबिक्स केल्याने रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे आपल्याला उत्साही वाटते. शिवाय रक्ताभिसरण चांगले झाल्याने पुरुषांमध्ये इरेक्शन होण्यास मदत होते. तर, स्त्रियांमध्ये योनीतून लुब्रिकेशन आणि संवेदना निर्माण होण्यास मदत होते.

- जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता, तेव्हा तुमची सहनशक्ती वाढते. जी लैंगिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार, अर्ध्या तासाची लैंगिक क्रिया पुरुषांमध्ये 125 कॅलरीज आणि महिलांमध्ये सुमारे 100 कॅलरीज बर्न करू शकतात

-व्यायामादरम्यान अनेकजण डाएट करता. त्यामुळे ते पहिल्यापेक्षा जास्त फिट राहताता. त्यामुळे अशा लोकांचा आत्मविश्वास वाढतो. जर्नल ऑफ पर्सनॅलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या 2019 च्या संशोधनानुसार, आत्मविश्वास असलेले पुरूष महिलांना अधिक रोमँटिक वाटतात.

- तणाव, चिंता असल्यास त्याचा लैंगिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पण जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हा तणाव, चिंता, डिप्रेशन कमी करण्यासाठी खूप मदत मिळते. यामुळे त्यांच्यातील लैंगिक इच्छा वाढण्यास मदत होते. तसेच व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. मधुमेहासारखी समस्या कमी होऊन तुमचे एकूणच आरोग्य चांगले राहते.

Exercise

किती व्यायाम करणे फायद्याचे

नियमित व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत चांगला आहे. पण जोरात चालणे, हळू चालणे, एरोबिक्स, वजन उचलण्याची क्रिया केल्याने लैंगिक आरोग्य सुधारू शकते. रोज २० ते ३० मिनीटांचा व्यायाम तुमच्यासाठी फायद्याचा असतो. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि आहार योग्य ठेवणे महत्वाचे असते. यामुळे तुमचे लैंगिक आरोग्य चांगले राहू शकेल. पण, तुम्हाला लैंगिक आरोग्यासंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT