mobile esakal
health-fitness-wellness

पुरूषांनो, सतत मोबाईल बघितल्याने होतोय तुमच्या शुक्राणूंवर परिणाम! अभ्यासात स्पष्ट

दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण केले

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण करून सल्ला दिला की, मोबाईलममधून बाहेर पडणारे विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic waves) शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

सध्याच्या काळात मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग झाला आहे. मोबाइल बघितला नाही तर अनेकांचा जीव कासाविस होतो. जगभरातील लाखो लोकांना दिवसभर मोबाईलवर (Mobile) काम करत रहावे लागते. लहान मुलांच्या (Children) अभ्यासापासून अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. किपॅड मोबाईलची जागा आता मोबाईलने घेतली आहे. शिवाय चांगलं नेटवर्क (Network) मिळाल्याने लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत. पण या मोबाईलच्या अतिवापरामुळे वैवाहिक जीवनात (Marriage Life) अडचणी निर्माण होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे पुरूषांमध्ये वंध्यत्वाची (Infertility) समस्या निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या अतीवापरामुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm count and quality) आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. १८ अभ्यासांवर (Study) आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Sperm

असा आहे अभ्यास

दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण करून सल्ला दिला की, मोबाईलममधून बाहेर पडणारे विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic waves) शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी (Men) मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

शेफिल्ड विश्वविद्यालयातील एंड्रेलॉजीचे प्राध्यापक आणि शुक्राणू विशेषज्ञ एलन पेसी (Allan Pacey) यांनी संशोधकांच्या या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, आधुनिक जीवनातील (Lifestyle) बदल पुरूषांच्या शुक्राणूंसाठी कदाचित अनुकूल नसावेत, पण, हे हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. कारण हा अभ्यास गेले दहा वर्ष चालू आहे. जर पुरूषांमध्ये या अभ्यासामुळे काळजीचं वातावरण असेल तर त्यांनी मोबाईलचा वापर टाळायला हवा.

तर, पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक डॉ. यून हाक किम म्हणाले की, जे पुरूष मोबाईलचा अधिक वापर करतात त्यांनी आपल्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या योग्य ठेवण्याासाठी मोबाईलचा वापर कमी करावा. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोनमधून निघणाऱ्या चुंबकिय तरंगांच्या संपर्कात आल्याने शुक्राणू प्रभावीत होतात. यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.'

MEN

वाढत्या वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता घसरते

जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रेलियातील जगात आघाडीवर असणाऱ्या IVF क्लिनिकने ने जवळपास 40 हजारांहून अधिक शुक्राणूंच्या चाचण्यांचे विश्लेषण केले. त्यानंतर त्यांनी वाढत्या वयाबरोबर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत जाते, असा दावा केला. ५५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये शुक्राणूंची कमतरता दिसून येते. त्याच वेळी, महिलांना गर्भधारणेच्या समस्या देखील येतात. अभ्यासात असेही आढळून आले की 40 टक्क्यांहून अधिक वंध्यत्वाची प्रकरणे पुरुषांशी संबंधित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT