omicron on skin 
health-fitness-wellness

ओमिक्रॉन त्वचेवर एक दिवस अन् प्लॅस्टिकवर आठवडाभर राहतो जिवंत! अभ्यासातील निष्कर्ष

जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी याविषयी अभ्यास केला.

सकाळ डिजिटल टीम

जगभरात सध्या झपाट्याने ओमिक्रॉनचा प्रसार वाढतो आहे. त्यामुळे साहजिकच रूग्णसंख्या वाढते आहे. म्हणूनच संपूर्ण जगासाठी ओमिक्रॉन (Omicron) हा चिंतेचा विषय झाला आहे. म्हणूनच याबाबत विविध अभ्यास (Study) सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातील निष्कर्ष ओमिक्रॉनचा संसर्ग का वाढतोय हे सांगणारे आहेत. कोरोनाव्हायरसचा ओमिक्रॉन प्रकार हा त्वचेवर (Skin) २१ तासांहून अधिक काळ आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो. इतर स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉन जलद पसरण्यासाठी ही कारणे असल्याचा दावा एका अभ्यासात केला आहे.

जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी SARS-CoV-2 वुहान स्ट्रेन तसेच सर्व प्रकारची चिंता वाटणाऱ्या विषाणूंमधील (VOCs) पर्यावरणीय स्थिरतेमधील फरकांचे विश्लेषण केले. प्रीप्रिंट रिपॉझिटरी BioRxiv वर अलीकडेच केलेल्या पीअर-पुनरावलोकन केलेल्या अभ्यासात आढळले की, अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन रूपे वुहान स्ट्रेनपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेच्या पृष्ठभागावर दुप्पट जास्त काळ टिकून राहतात.

संशोधनात काय आढळले?

VOCs ची उच्च पर्यावरणीय स्थिरता संपर्क प्रसाराचा धोका वाढवते. तसेच त्याचा प्रसार वाढविण्यास हातभार लावते, असे अभ्यासाच्या लेखकांनी सांगितले. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की VOCs मध्ये ओमिक्रॉनची पर्यावरणीय स्थिरता सर्वात जास्त आहे. म्हणूनच डेल्टापेक्षा ओमिक्रॉन वेगाने पसरला. किंबहुना ओमिक्रॉनने ती जागा घेतली असे शास्त्रज्ञ म्हणाले. प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर केलेल्या अभ्यासात असे दिसले की, मूळ स्ट्रेनचा सरासरी जगण्याची वेळ ओमिक्रॉन प्रकारासाठी ते 193.5 तासांच्या तुलनेत अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा यांच्या अनुक्रमे 56 तास, 191.3 तास, 156.6 तास, 59.3 तास आणि 114 तास होते, असे संशोधकांनी सांगितले.

त्वचेवर केलेल्या अभ्यासात आढळले?

त्वचेच्या नमुन्यांवर केलेल्या अभ्यासात त्वचेवर व्हायरस राहण्याची वेळ 8.6 तास, अल्फासाठी 19.6 तास, बीटासाठी 19.1 तास, गामासाठी 11 तास, डेल्टासाठी 16.8 तास आणि ओमिक्रॉनसाठी 21.1 तास होते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र, अल्फा आणि बीटा त्वचेवर टिकून राहण्याच्या वेळेत कोणताही मोठा फरक नव्हता. त्यांच्यात एकसमान पर्यावरणीय स्थिरता होती. संशोधकांच्या मते, ही स्थिरता मागील अभ्यासाच्या परिणामांशी जो़डलेली किंवा सुसंगत आहे. तर, अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हॅरियंटनी पर्यावरणीय स्थिरतेच्या प्रतिसादात इथेनॉल प्रतिरोधकतेमध्ये थोडीशी वाढ झाल्याचे दाखवले. मात्र, त्वचेच्या पृष्ठभागावरील सर्व VOCs हे 35 टक्के इथेनॉलच्या संपर्कात आल्याने 15 सेकंदात पूर्णपणे निष्क्रिय झाले. म्हणूनच सध्याचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी (हातांची स्वच्छता) जंतुनाशकांचा वापर करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने प्रस्तावित केल्याचे संशोधकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील मतांची आघाडी-८४१ आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT