मोसंबीचे फायदे Esakal
health-fitness-wellness

Health Tips : Slim फिगर आणि Glowing त्वचेसाठी मोसंबी खाणं फायदेशीर, जाणून घ्या मोसंबीचे फायदे

थकवा दूर करून शरीरात एनर्जी लेव्हल वाढवणाऱ्या या मोसंबीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते केस आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी मोसंबीचं सेवन उपयुक्त ठरतं

Kirti Wadkar

फळं ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येक फळांमधील पोषक तत्वं Supplementary Substances शरीरासाठी उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे भारतात मिळणारं मोसंबी हे फळ देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Sweet Lemon good for skin and keep you slim Marathi tips

केवळ उन्हाळ्यातच Summer नव्हे तर अलिकडे मोसंबी हे बाजारात बाराही महिने उपलब्ध असलेलं फळं आहे. चवीला गोड आणि आंबट असलेलं मोसंबीचं फळं SWEET LEMON खावून किंवा उन्हाळ्याच्या तडाख्यात तसंच थकवा जाणवत असताना मोसंबीचा ज्यूस पिऊन लगेचच एनर्जी Energy Level वाढते.

थकवा दूर करून शरीरात एनर्जी लेव्हल वाढवणाऱ्या या मोसंबीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते केस आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी मोसंबीचं सेवन उपयुक्त ठरतं.

मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्याचप्रमाणे या फळात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए तसचं कॅल्शियम, प्रोटीन, झिंक, फायबर आणि आयर्नदेखील उपलब्ध असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

पचनक्रिया सुधारण्यास मदत- मोसंबीमध्ये असलेल्या फ्लेवोनॉइड्समुळे पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारल्याने अपचन आणि गॅसच्या समस्या दूर होतात. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. पचनक्रिया Digestion सुधारण्यासाठी तुम्ही मोसंबी ज्यूसमध्ये चिमूटभर काळं मीठ टाकून ज्यूसचं सेवन करू शकता.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते- मोसंबीमध्य मोठी प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफाइंग गुणधर्म आढळतात. यामुळे जखम लवकर भरण्यास तसचं रक्तप्रवाह सुरळीत होण्यास आणि संसर्ग दूर होण्यास मदत होते. तसचं मोसंबीमधील पोषक तत्वांमुळे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

केसांसाठी फायदेशीर- केस गळती कमी व्हावी आणि केसांची वाढ व्हावी यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या प्रोडक्टवर भरपूर पैसे खर्च करतात. त्याएवजी नियमितपणे मोसंबीचं सेवन केल्यास केसांना पुरेसं पोषण मिळाल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.

मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व उपलब्ध असल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केसांची वाढ होते तसंच केसांमधील कोंडा किंवा फाटे फुटण्याची समस्या कमी होते,

त्वचेवर येईल ग्लो- मोसंबी खाल्ल्याने किंवा मोसंबीच्या ज्यूसचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यास तुमच्या त्वचेलाही फायदा होईल. मोसंबीमधील व्हिटॅमिन सी मुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास तसचं चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.

मोसंबीमधील पोषक गुणधर्मांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या मऊ आणि हायड्रेट राहते तसचं चेहऱ्यावर ग्लो येतो.

वजन कमी करण्यासाठी – मोसंबीच्या सेवनाने पचंनक्रिया सुरळीत होत असल्याने अन्नाचं योग्य पचन झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे मोसंबी ज्यूसमध्ये १ चमचा मध मिसळून सेवन करू शकता.

हाडं मजबूत होतात- मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. यामुळे सूज आणि दाह कमी होतो.

याचप्रमाणे मोसंबीच्या नियमित सेवनामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी मोसंबी ज्यूस उपायकारक आहे. त्याचप्रमाणे मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी आणि मूत्राशयाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मोसंबी अत्यंत फायदेशीर आहे.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT