sushant singh rajput 
health-fitness-wellness

नैराश्य तुम्हालाही असू शकतं; जाणून घ्या प्राथमिक लक्षणं

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुतने मंगळवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक अशी घटना घडली. नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. बऱ्याच काळापासून सुशांतवर उपचार सुरु होते. नैराश्याने ग्रासलेले लोक लगेच ओळखता येणं कठीण असतं. इतर रुग्णांप्रमाणे त्यांचा हा आजार दिसून येत नाही. चेहऱ्यावर हसू दिसतं पण त्या हास्याच्या मागे मनात सुरु असलेले युद्ध सहजासहजी दिसत नाही. हे नैराश्य हसत खेळत असलेल्या व्यक्तीच्या अचानक अशा निर्णयानेच समोर येतं. ते समजतं तोपर्यंत उशिर झालेला असतो. यासाठी नैराश्याची काही प्राथमिक लक्षणं माहिती असायला हवीत.

आय़ुष्यात माणसांना अनेक चढ उतार अनुभवायला मिळतात. यात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर एखादा धक्का मनावर खोल जखम करून जातो. यातून सावरणं कठीण असतं पण आजुबाजुच्या लोकांना जर याची कल्पना असेल तर त्या व्यक्तीला मोठी मदत होऊ शकते. वेळीच अशा व्यक्तीला जर इतरांचे सहकार्य मिळाले, साथ मिळाली तर बराच फरक पडू शकतो. यामुळे असे धक्कादायक पाऊल उचलणारे सुशांत वाचवता येतील.

नैराश्याने ग्रासलेल्या लोकांमध्ये काही लक्षणं आढळून येतात. त्यामध्ये ठराविक काळाने अशा व्यक्तींना रडू येतं. अचानक उदासिनतेची भावना मनात निर्माण होते. अगदी सकाळी वेळेत उठून लवकर दिवस सुरु करण्याची इच्छाही नसते. सातत्याने थकवा जाणवणे, सर्जनशीलतेची प्रेरणा नष्ट होणे असे प्रकार होतात. निऱाशा मनात असल्याने अनेकदा नकारात्मक विचारांचे काहुर मनात दाटलेलं असतं. अशावेळी काही चांगलं घडलंच नाही असंच त्यांना वाटत असतं. यामुळे पुन्हा पुन्हा मन निराश झाल्यासारखं वाटतं.

जीवन खोल गर्तेत बुडत असल्याचं वाटत राहतं आणि सतत असमाधानाची भावना मनात असते. अनेक चांगल्या गोष्टी असतात. आयुष्यात यशही मिळालेलं असतं तरीही काहीतरी असतं ज्यातून त्यांना समाधान झालं असं वाटत नाही. अनेकदा अशा व्यक्ती समाजापासून आणि सामाजिक जीवनापासून दूर राहतात. त्यांना लोकांमध्ये मिसळण्यापेक्षा एकटं रहावं असं वाटत असतं. 

केवळ काही प्राथमिक लक्षणांवरून एखाद्याला नैराश्य आलं आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. अशा व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधायला हवा. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्याला एकटं वाटणार नाही याची इतरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नैराश्याची लक्षणं दिसत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावं. 

(मानसिक विकाराची ही प्राथमिक लक्षणं आहेत. निराशेनं ग्रासलेल्या व्यक्ती  सहजासहजी ओळखता येत नाहीत त्यामुळे तज्ज्ञांशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावेत.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT