शरीराला पुरेसे आयोडिन नाही मिळाले तर संपूर्ण शरीराच्या कार्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.
सोलापूर : आयोडिन (Iodine) हे मानवी शरीरास अत्यंत आवश्यक असलेले नैसर्गिक मूलद्रव्य आहे. भविष्यातील आरोग्याचा विचार करून शरीराला पुरेसे आयोडिन मिळणे खूपच गरजेचे आहे आणि त्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही काळजी आपल्या खाण्या- पिण्यातूनच घेणे गरजेचे आहे. पुरेशा सकस आहाराबरोबरच आयोडिनचे समतोलही राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या फास्ट फूडच्या (Fast Food) काळात आयोडिनचा विसरच पडलेला दिसत आहे. आज शरीराच्या काळजीपेक्षा जिभेचे चोचले पूर्ण करण्याला महत्त्व दिले जात आहे. शरीराला पुरेसे आयोडिन नाही मिळाले तर संपूर्ण शरीराच्या कार्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. यातून शरीराची वाढ थांबणे आणि थॉयरॉईड (Thyroid) आदी समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी आपली भावी पिढी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आहारामध्ये आयोडिनयुक्त मिठाचाच (Iodized salt) वापर करणे गरजेचे आहे.
आयोडिनची गरज...
लहान मुलांना 0.5 ते 1 मायक्रो ग्रॅम आयोडिन लागते. प्रौढ व्यक्तीस रोज 100 ते 200 मायक्रोग्रॅम आयोडिनची गरज असते. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात थॉयरॉईड ग्रंथीमध्ये 20 ते 25 मिलिग्रॅम आयोडीनचा साठा असतो.
या पदार्थांमधून मिळते शरीराला आयोडिन...
समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मीठ आणि समुद्राच्या पाण्यातील मासे, खेकडे, शिंपले आदी प्राण्यांतून आयोडिन जास्त मिळते. समुद्रालगतच्या जमिनीतही काही प्रमाणात आयोडिन असते. त्यामुळे तेथे पिकणाऱ्या भाज्या, फळे, धान्य यामध्ये आयोडिन असते. जसजसे समुद्रापासून दूर जावे तसतसे मातीतील आयोडिनचे प्रमाण व तेथे पिकणाऱ्या अन्नपदार्थातील आयोडिन कमी होत जाते. 1 ग्रॅम मिठात 77 मायक्रोग्रॅम आयोडिन असते.
कार्य...
थॉयरॉईड ग्रंथीचे टी 3, व टी 4 हे स्राव तयार करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आयोडिन लागते. हे स्राव शरीरातील चयापचय क्रियेचे नियंत्रण करते.
काय घ्यावे काय टाळावे?
आहारात मुळा, कोबी, फ्लॉवरचे प्रमाण मर्यादित असावे
आहरात नेहमी फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे
आयोडिनयुक्त मीठ घ्यावे
समतोल पोषक आहार घावा
आयोडिन कमतरतेचा परिणाम...
मानसिक आजार वाढतो
गरोदर असताना व स्तनपान देणाऱ्या मातेला आयोडिनची विशेष गरज असते. गर्भधारणेनंतर मातेच्या शरीरात पुरेसे आयोडिन नसेल तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो
आयोडिनच्या कमतरतेमुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवते. आज ही समस्या बऱ्याच मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते
गलगंड हा आजार होतो. या आजारामध्ये थायरॉईड ग्रंथीची वाढ होते आणि यालाच गलगंड म्हटले जाते.
स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व नवजात बालकाचे मृत्यू होतात. आयोडिनच्या कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम, मेंदूची वाढ खुंटणे, शारीरिक वाढ खुंटणे आदी विकार उद्भवतात.
आयोडिन कमतरतेची लक्षणे...
अशक्तपणा येणे
वजन वाढणे
थकल्यासारखे होणे
थंडी वाजणे
केस गळणे
त्वचा कोरडी पडणे
कुठल्याही गोष्टीचा विसर पडणे
निरुत्साही असणे
मासिक पाळीत अनियमितता येणे
झोप जास्त येणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.