Top 10 Home Remedies For Low Blood Pressure 
health-fitness-wellness

या दहा कारणामुळे कमी होऊ शकतो रक्तदाब ; जाणून घ्या घरगुती उपाय

अर्चना बनगे

कोल्हापूर: कोणत्याही कारणाशिवाय वारंवार चक्कर येणे, अथवा नेहमी अशक्तपणा जाणवणे ही कारणे कमी रक्तदाबाचे संकेत असू शकतात. कमी रक्तदाब झाल्यानंतर आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सामान्य स्वरूपापेक्षा अतिशय कमी होतो.  याला हायपोटेन्शन असे म्हणतात. वैद्यकीय सल्‍लागार यांच्या मते सामान्य  माणसाचा रक्तदाब हा 120/ 80mmhg  पासून 90/60mmhg यादरम्यान असला पाहिजे. जर तुमचा रक्तदाब 90/60mmhg पेक्षा कमी झाला तर या स्थितीला लो ब्लड प्रेशर किंवा हायपोटेन्शन असे म्हणतात.

आपल्या देशामध्ये अनेक महिलां हायपोटेन्शन या समस्याने ग्रस्त आहेत. हायपोटेन्शन समस्याकडे अधिक वेळ आपण दुर्लक्ष केले तर आपल्या शरीरासाठी ते अतीशय धोकादायक ठरू शकतो. यासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला अशक्तपणा  किंवा थकवा जाणवू लागला तर तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. हायपो टेन्शनच्या कारणावरून हृदय विकाराचा धोकाही वाढतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हायपोटेन्शन ची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यापासून आपली सुटका कशी करून घ्यावी याबाबत माहिती देणार आहोत.(Best Home Remedies For Low Blood Pressure)


हायपोटेन्शनचे कारण कमी रक्तदाबामुळे हा आजार उद्भवतो. आपण कमी रक्तदाब कशामुळे होते याबाबतची कारणे जाणून घेऊया.
 १)तणाव भीती आणि असुरक्षितता वाटणे 
२)शारीरिक थकवा 
३)डिहायड्रेशन मुळे शरीरातील रक्त कमी होणे 
४)अंतर्गत रक्तस्राव 
 ५)दुखापत मुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे गर्भावस्थेच्या कारणामुळे 
 ६)हाय ब्लड प्रेशर ची औषधे अधिक घेणे 
७)डिप्रेशनचे शिकार होणे 
८)हृदयरोग
 ९)ॲलर्जी.

* कमी रक्तदाबाची लक्षणे (Symptoms of low blood pressure)
खालील लक्षणावरून तुम्हाला कमी रक्तदाबाची जाणीव होते.
वारंवार चक्कर येणे 
अस्पष्ट  दिसणे 
नेहमी अस्वस्थ वाटू लागणे 
शारीरिक कमजोरी वाटणे
 नेहमी थकवा राहणे
 वारंवार आळस येणे
 जास्त थंड वाजणे 
मोठ्या प्रमाणात घाम येणे
 श्वास घेण्यासाठी अडचण येणे
 नाडी कमजोर होणे
 ही लक्षणे तुम्हाला कमी रक्तदाब बाबत इशारा देत असतात.

कमी रक्तदाबावर आपण काही घरगुती उपाय योजना करू शकतो.(Home Remedies For Low Blood Pressure)

* हायपोटेन्शन वर घरगुती उपाय
 *ब्लॅक कॉफी च्या माध्यमातून कमी रक्तदाबाची समस्या
डार्क कॉफी पिल्यामुळे आपली कमी रक्तदाबाची समस्या तात्काळ तात्काळ दूर होते.


आवश्यक साहित्य 
कॉफी पावडर अर्धा चमचा
 साखर आवश्यकतेनुसार 
गरम पाणी एक कप 


वापरावयाची  पद्धत (Process)
 गरम पाणी साखर आणि कॉपी एकसारखे मिक्स करा आणि ते हळूहळू सेवन करा. जेव्हा हायपोटेन्शन ची समस्या ठीक होत नाही तेव्हा हे कॉफी नियमीतपणे द्यावे.  कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे कॉफी घ्यावे असे डॉक्टर सांगतात.


कशी फायदेशीर आहे ब्लॅक कॉफी ब्लॅक (Use of Black Coffee)
कॉफी घेतल्यामुळे आपले कमी रक्तदाबाची समस्या खूप प्रमाणात सुधारते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवणानंतर कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी लगेच कॉफी घेणे आवश्यक आहे. कॉपी हे कॅफीन घटकाने समृद्ध असते जे कमी रक्तदाबाच्या समस्येला नियंत्रित करते. याशिवाय अचानक आपण आपली स्थिती बदलल्यानंतर कमी होणारे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होतो. परंतु कॉफी नियमित घेण्यापूर्वी  डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच कॉफी किती प्रमाणात घ्यावी हे निश्चित करावे.


मीठ साखर पाणी 
 आवश्यक साहित्य
 मीठ अर्धा चमचा 
साखर अर्धा चमचा 
पाणी एक ग्लास


 वापरावयाची पद्धत 
पाण्यामध्ये मीठ आणि साखर चांगल्या पद्धतीने मिक्स करा त्यानंतर हे पाणी थोड्या थोड्या वेळाने पीत रहा. यामुळे तुम्हाला  फ्रेश वाटू लागेल.


असा होतो मीठ साखर पाण्याचा फायदा
अनेक तज्ञ डॉक्टर कमी रक्तदाब झाल्यानंतर मीठ साखर पाणी पिण्याचा सल्ला देतात. हे पाणी आपले हायपोटेन्शन ची समस्या दूर करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरते. खासकरून क्युरली मेडिएटेड हायपोटेन्शन या व्याधीने ग्रस्त असलेल्या साठी हे मीठ पाणी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपले  रक्तदाब लगेच वाढते.


तुळस हे अधिक फायदेशीर
 आवश्यक साहित्य 
तुळशीची पाणी आठ ते दहा
 पाणी एक ते दीड कप
 लिंबू एक छोटा


 वापरावयाची पद्धत 
सुरुवातीस एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये तुळशीची पाणी टाका. हे पाणी उकळल्यानंतर एका कप मध्ये काढून घ्या. आता त्यामध्ये लिंबू पिळा. हे मिश्रण तुम्ही चहा सारखे घेऊ शकता. यामुळे तुम्हाला लगेच आराम वाटू लागते.


 असा होतो फायदा 
तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. यामुळे आपले कमी रक्तदाब चांगल्या पद्धतीने नियंत्रित होते. नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये महिलांच्या मध्ये होणाऱ्या या आजारात तुळशीचे रस अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. तुळशीच्या सेवनामुळे आपला रक्तदाबही वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT