Eyes Sakal
health-fitness-wellness

डोळे हे मानवाला लाभलेले अनमोल इंद्रिय! त्यांची 'अशी' राखा निगा

डॉ. रायचूर म्हणतात, डोळे हे मानवाला लाभलेले अनमोल इंद्रिय! त्यांची 'अशी' राखा निगा

प्रकाश सनपूरकर

डोळ्यांची प्रत्येक वयोगटात अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. घ्यावयाची काळजी समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात डोळ्यांचे (Eyes) महत्त्व अबाधित असे आहे. निसर्गाने मानवाला नेत्र हे इंद्रिय दिल्याने त्याचा उपयोग करून तो प्रत्येक गोष्ट पाहू शकतो. सस्तन प्राण्यांमध्ये सर्वांत अधिक विकसित असे नेत्र मानवाला मिळाले आहेत. या डोळ्यांची प्रत्येक वयोगटात अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. घ्यावयाची काळजी समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. या नेत्रांचे कार्य समजून घेत असताना आपल्याला नेत्रदानासारख्या श्रेष्ठ दानाची संधी देखील उपलब्ध होते.

गेल्या 40 वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉ. हरिश्‍चंद्र रायचूर यांच्या माध्यमातून हजारो नेत्ररुग्णांना पुन्हा स्वच्छ दृष्टीने जग पाहण्याची संधी मिळाली आहे. रुग्णांनी त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. एका डोळ्याच्या दानातून चार रुग्णांना जग पाहण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प व कृती व्हावी, असे मत काही रुग्णांनी व्यक्त केले आहे.

डोळ्यांची निगा उत्तमपणे राखण्यासाठी डॉ. रायचूर यांनी दिलेल्या काही टिप्स...

प्रीम्यचुअर बेबी : जेव्हा लहान मुले गर्भाशयातील नऊ महिन्यांच्या कालावधीपेक्षा आधी जन्मतात, तेव्हा त्याला प्रीम्यचुअर बेबी असे म्हणतात. या प्रकारच्या मुलांमध्ये जन्मल्यानंतर नेत्रपटल अविकसित राहणे हा एक प्रश्‍न असू शकतो. त्याला रेटिनोपॅथी प्रीम्यचुअरिटी असे म्हटले जाते. तेव्हा बाळ जन्मल्यानंतर बाळाची तपासणी केली तर हा दोष लगेच तपासून तो दूर करता येतो. म्हणजे प्रतिबंधक उपायाने हे बरे होते. मात्र हा दोष तेव्हाच दुरुस्त न केल्यास नंतर त्यावर उपाय होणे अशक्‍य होते. तेव्हा बाळाच्या पालकांनी याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.

लहान मुले : सर्वसामान्य लहान मुलात तिरळेपणासारखे दोष आढळतात. हे लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यावर तपासणी करून उपाय करायला हवेत. तसेच मूल मोठे झाल्यावर उपचार करणे चुकीचे आहे. वय वर्षे तीन ते सहा या वयोगटात त्यावर उपचार करणे आवश्‍यक आहे. नंतर उपचार यशस्वी होणे अडचणीचे होते.

डोळ्यांचा नंबर लागणे हा दोष नव्हे : अनेक मुलांना लहानपणी डोळ्यांचा नंबर लागतो. म्हणजे मुलात काही दोष आहे असे समजले जाते. हा गैरसमज आहे. ही बाब निव्वळ तांत्रिक आहे. त्यावर वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. नंबर लागला तर मुलांची नेत्रतपासणी दर सहा महिन्याला करावी. नंबर वाढण्याचे प्रमाण खूप अधिक असेल तर आता त्यावर नवे उपाय निघाले आहेत. त्यामुळे नंबर वाढण्याचा वेग मर्यादित करता येतो. पण हे सर्व नियमित तपासणीतून साध्य होते.

संगणक व मोबाईल पाहण्याचे डोळ्यांवर होणारे परिणाम

  • अ. ऑनलाइन शिक्षण व डोळ्यांची काळजी : सर्वसाधारणपणे कोविड काळात मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम व घरीच ऑनलाइन शिक्षण या गोष्टी सुरू आहेत. यामध्ये लहान मुले खूप अधिक मोबाईल पाहात आहेत. तेव्हा मुलांना मोबाईलचा वापर फक्त शाळेच्या तासापुरता करण्यास परवानगी द्यावी. नंतर मोबाईल वापरू नये. सलग काही मिनिटे मोबाईल पाहिला तर मध्ये थांबून दूरपर्यंत दृष्टी टाकावी. तसेच काहीवेळ डोळे मिटून डोळ्यांना विश्रांती द्यावी.

  • ब. "वर्क फ्रॉम होम'मधील डोळ्यांची काळजी : मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम केले जात आहे. संगणकावर आठ ते दहा तास काम करावे लागत आहे. तेव्हा संगणकावर काम करताना आपल्या दृष्टीच्या खालील भागात संगणक असावा. तसेच अधूनमधून खिडकीतून दूरपर्यंत पाहावेच, म्हणजे डोळ्यांना व्यायाम मिळतो. तसेच वीस ते तीस मिनिटांनंतर संगणकासमोरून उठून थोडे इकडेतिकडे फिरावे. नंतर पुन्हा संगणकावर काम करावे. नव्या संगणकावर मॉनिटर हे बरेचसे सोपे व डोळ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे विकसित झालेले असावेत. तरीही त्याचा ब्राईटनेस व कॉन्ट्रॅस्ट त्रासदायक असू नये, हे लक्षात घ्यावे.

चष्मा किंवा नंबर आल्यास नवे पर्याय : साधारणपणे तरुण वयात डोळ्यांना नंबर आल्यास अनेकांना चष्मा वापरण्याबाबत संकोच वाटतो. पण ते चुकीचे आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार चष्म्याचा वापर केला पाहिजे. आजकाल कॉन्टॅक्‍ट लेन्सचा पर्याय चष्म्याला वापरण्याचे तंत्र आहे, त्याचा उपयोग डॉकटरांच्या सल्ल्याने करावा. लेझर लॅसिक हे तंत्रज्ञान देखील तेवढेच उपयुक्त ठरते.

मधुमेह व नेत्राचे कार्य : सर्वसाधारणपणे मधुमेह आजार मोठ्या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित तपासणी करायला हवी. मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करायला हवी. डोळ्यातील रेटिनामध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांवर मधुमेहाचा काही परिणाम होतो का हे तपासण्याचे अत्याधुनिक तंत्र विकसित झाले आहे. त्याचा उपयोग होतो.

मोतीबिंदू : वयाच्या पन्नाशीनंतर मोतीबिंदू आढळतो. हा आजार नसून केवळ वयाने होणारी बाब आहे. वयानुसार केस पांढरे होणे यांसारख्या लक्षणाप्रमाणे हे आहे. त्याबद्दल काळजी करण्याचे कारण नसते. पूर्वी मोतीबिंदू पिकल्यावर ऑपरेशन करू, असे म्हणत आता तो प्रकार राहिला नाही. नव्या तंत्राने मोतबिंदूवर उत्तम पद्धतीने सोप्या शस्त्रक्रिया करता येतात. नव्या उपचार तंत्राने दृष्टी सामान्य होणे व नंबर कमी होणे असे उत्तम परिणाम साधले जाऊ शकतात.

चला नेत्रदान करू या : डोळ्यांच्या बाबतीत अत्यंत आवश्‍यक असे नेत्रदानाचे कार्य प्रत्येकाला करता येण्यासारखे आहे. यामध्ये मरणोत्तर नेत्रदान अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ डोळ्यातील बुब्बूळ काढून हे गरजू व्यक्तीच्या डोळ्यात प्रत्योरोपित होते. नव्या तंत्रानुसार अंध व्यक्तीच्या डोळ्यात कॉर्नियाचा नेमका कोणता भाग हवा आहे याचे विश्‍लेषण केले जाते. तेवढाच भाग त्याला दात्याच्या कॉर्नियामधून दिला जाऊ शकतो. यामुळे आता एका व्यक्तीच्या नेत्रदानाचा लाभ एकाऐवजी चारजणांना दिला जाऊ शकतो. त्यामुळे नेत्रदात्याचे नेत्रदान चारजणांना दृष्टी देणारे असू शकते. त्यामुळे समाजात नेत्रदानाचे अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येकाने या कार्यात हातभार लावून गरजू व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे कार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT