मासिक पाळी सुरू झाल्यावर अनेकजणी आता सॅनेटरी पॅड्स वापरतात. सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) परवडतात म्हणून अनेक महिला (Womens) वापरतात. शिवाय ते सहज उपलब्ध होतात. मात्र महिलांसाठी मासिक पाळीसाठी (Periods) पॅड्सबरोबर आता इतरही अनेक उत्पादन उपलब्ध झाली आहेत. त्यात टॅम्पन्स, मासिक पाळीचे कप यांचा समावेश आहे. सध्या मेन्स्ट्रुअल कप (Menstrual Cup )ने खूप लोकप्रियता मिळवलेली आहे.
मासिक पाळीचे कप हे धुवून स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात. ते सिलिकॉन किंवा रबरपासून बनवले असतात. हे फनेल आकाराचे कप आकाराने लहान आणि ते मऊ, लवचिक असून ते सहजपणे वापरता येतील, अशा पद्धतीने तयार केले जातात. हे कप योनीमार्गात घालायचे असतात. तिथे ते व्यवस्थित बसल्यावर त्यात रक्त गोळा होते. पॅड्समध्ये रक्त पडल्यावर ते पसरते. पण येथे ते कपमध्ये साठते. दिवसातून तीन चार वेळा कप काढून तो धुवून परत वापरता येतो. हे कप कोणत्याही प्रकारच्या संसर्गास कारणीभूत नसतात, असे मानले जाते. पण हे कप प्रत्येकासाठी नाहीत हे समजून घेणे गरेजचे आहे. काही गोष्टी आहेत ज्यामुळे महिलांना हे कप वापरता येत नाहीत. सिलिकॉन ऍलर्जी, IUD असणे, योनीमार्गावरील शस्त्रक्रियेनंतर ते वापरता येत नाहीत. मासिक पाळीच्या कपात घ्यावयाची काळजी आणि कोणत्या परिस्थितीत हे कप टाळावे याबद्दल डॉ. तान्या, एमबीबीएस एमएससी (ऑक्सॉन), FRSPH उर्फ डॉ. क्युटरस हिने इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे .
1) सिलिकॉनची एलर्जी (Silicone Allergies)
सिलिकॉन ऍलर्जी ही कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसचा एक दुर्मिळ प्रकार आहे. यामुळे एखादी व्यक्ती सिलिकॉनपासून बनवलेल्या पदार्थांच्या संपर्कात आल्यावर त्याची त्वचा लाल, खडबडीत होते.तसेच खूप खाज सुटते. सिलिकॉन हा मानवनिर्मित पदार्थ असून तो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नैसर्गिक सिलिकॉन या रसायनांनी तयार झालेला असतो. ज्या व्यक्तीला या मऊ आणि लवचिक पदार्थाची (flexible material) ऍलर्जी असल्याने, तिच्या त्वचेवर सूज येण्याबरोबरच खाज सुटणे, मळमळ होणे, श्वासनलिका सुजलेली असल्याची लक्षणे दिसतात. तसेच दमा आणि डोळ्यांचा संसर्ग होतो. जर तुम्हाला सिलिकॉन एलर्जी असेल तर तुम्ही सिलिकॉनपासून बनविलेला मेन्स्ट्रुअल कप वापरणे पूर्णपणे टाळले पाहिजे. या मटेरिअलची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी बाजारात इतर काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यात रबरापासून बनवलेल्या कपचा समावेश आहे.
2) जर तुम्ही गर्भनिरोधक (IUD)साधन वापरले असेल तर (If you have an IUD inserted)
IUD किंवा इंट्रायूटरिन गर्भनिरोधक डिव्हाईस हे गर्भधारणा टाळण्यासाठी वापरली जाणारी गर्भनिरोधक पद्धत आहे. IUDमध्ये महिलांच्या योनीमध्ये कॉपर-टी टाकली जाते. ही दीर्घकाळ चालणारी गर्भनिरोधक पद्धत खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते आणि याने गर्भधारणा होण्याची शक्यता 1% पेक्षा कमी आहे. कॉपर टी IUD जेव्हा स्त्रीच्या योनीमध्ये घातला जाते तेव्हा त्याला एक टांगलेली स्ट्रिंग असते. IUD घातलेल्या लोकांना मासिक पाळीचा कप वापरू नका असे सांगितले जाते कारण ते कप बाहेर काढताना चुकून IUD मध्ये अडकू शकतात. असे केल्याने गर्भनिरोधकाचा प्रभाव कमी होतोच शिवाय खाली वेदनाही जास्त होतात.
3) योनिमार्गाच्या शस्त्रक्रियेनंतर (After Vaginal Surgery)
गर्भपात, पेल्विक फ्लोअर डिसीजमुळे नुकतीच योनीमार्गावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा नुकतीच प्रसूती झालेली असेल तर किमान 6 आठवडे टॅम्पन किंवा मासिक पाळीचा कप घालणे टाळले पाहिजे . वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण संसर्गाचा धोका या व्यक्तींना जास्त असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे कप वापरणे योग्य होणार नाही.
4) वजायनिजम्स / योनिसमस Vaginismus
योनीमध्ये अचानक ताण निर्माण होतो. बर्याच प्रकरणांमध्ये या स्थितीमुळे वेदनादायक संभोग होतो आणि एखाद्याला टॅम्पन किंवा मासिक पाळीचा कप घालताना काही प्रकारे वेदना होऊ शकतात. ही स्थिती सहसा लैंगिक संभोगाच्या चिंता किंवा भीतीशी जोडलेली असते. अशा महिलांना लैंगिक इच्छा कमी झाल्याची भावना होऊ शकते. योनिसमस असलेल्या लोकांना कप किंवा टॅम्पन घालणे खूप अस्वस्थ वाटू शकते. काहींना असे करण्याचा प्रयत्न करताना वेदना जाणवू शकतात.
५) जर तुम्हाला आरामदायक वाटत नसेल तर (If you are not comfortable)
मासिक पाळीत रक्तस्त्राव होताना जिथे सतत वाटते, अशावेळी कप घालणे हे कदाचित तुम्हाला सोयीस्कर वाटणार नाही. तुम्ही कितीही वेगवेगळे तंत्र वापरत असलात तरी, तुम्हाला मासिक पाळीचा कप वापरणे सोयीचे नसेल तर तुम्ही ते कोणत्याही परिस्थितीत टाळलेच पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.