depression 
health-fitness-wellness

नैराश्याच्या लक्षणांचे तीन प्रकार; तुम्हाला माहिती आहेत का? 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बराच काळ नैराश्याचा सामना करत असलेल्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर सगळीकडेच मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. इतर आजारांची लक्षणं जशी उघड दिसतात तशी नैराश्यामध्ये ती दिसतीलच असं नाही. तरीही अशा व्यक्तींचे वागणे, बोलणे आणि त्यांच्यात झालेल्या बदलामुळे व्यक्तीला निराशेनं ग्रासलं आहे का याबाबत समजू शकतं. 
आतापर्यंत अनेक रिसर्च यावर झाले आहेत. या अभ्यासातून बरीच माहिती समोर आली आहे. एखाद्यामध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आल्यास वेळ न दवडता पुढे येऊन त्यांची मदत केली पाहिजे. यामुळे संबंधित व्यक्तीला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत होते. 

नैराश्याची लक्षणं तीन प्रकारची
1 . मानसिक लक्षणां
मध्ये व्यक्ती दु:खी आणि स्वत:ला असहाय समजत असतात. एवढंच नाही तर अनेकदा कोणत्याही घटनेला ते स्वत:लाच दोषी मानत असतात. 
2 . शारिरिक लक्षणांमध्ये निराशेनं ग्रासलेली व्यक्ती थकलेली दिसून येते. ते खूपच हळू आवाजात बोलतात. त्यांच्या झोपेची वेळही बदललेली असते. रात्री उशिरापर्यंत जागरण आणि सकाळी लवकर न उठणे असे प्रकार सुरू असतात. 
3 . सामाजिक लक्षणांबद्दल सांगायचे झाले तर अशा व्यक्ती लोकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहणं टाळतात. समाजात अनेक कार्यक्रमांत भाग घेणंही टाळतात. रोजच्या सवयीसुद्धा ते बदलतात. त्यांना कुटुंबातही वेळ घालवताना त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही. 

निराशेनं ग्रासलेली व्यक्ती नेहमीच उदास असते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं पण तेसुद्धा क्षणिक असतं. त्यानंतर पुन्हा चेहऱ्यावर उदासी दाटून येते. याबद्दल काही विचारलं तर ते बोलणं टाळतात. बराच काळ त्यांना एकटं रहावं असं वाटतं. लोकांच्या गर्दीपासून बाजूला राहतात आणि एका खोलीत बंद करून घेणं पसंत करतात. तुमचा कोणी मित्र किंवा घरातील व्यक्तीला अशा सवयी असतील तर त्याला मदत करा. 

सतत काहीतरी विचार करत बसल्यानं मानसिक तणावाखाली वावरत असतात. यामुळे चेहऱ्यावरही चिंतेचे भाव दिसतात. अशा लोकांशी बोलून आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. कधी कधी जास्त तणावामुळे माणूस डिप्रेशनची शिकार होतो. 

निराशेमुळे व्यक्तीच्या भावनांमध्येही बदल होतो. सातत्यानं नकारात्मक विचार मनामध्ये डोकावतात. लोकांसमोरही तशाच प्रकारची चर्चा करत असतात. कोणतीही गोष्ट मान्य करण्यासाठी लवकर तयार होत नाहीत. यामुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर होतात आणि निराशेच्या गर्तेत सापडतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT