Endometriosis Symptoms esakal
health-fitness-wellness

Endometriosis Symptoms : 'एंडोमेट्रिओसिस' हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो; कशी घ्याल काळजी?

स्त्रियांमधील (PCOD) वंध्यत्व या आजाराच्या बरोबरीनेच सध्या वाढत जाणारा किंवा दिसून येणारा आजार म्हणजे एंडोमेट्रिओसिस.

सकाळ डिजिटल टीम

मासिक पाळीच्यावेळी, शरीर संबंधांच्यावेळी वेदना जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

-डॉ. ज्योती चव्हाण, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ chirayu.jyoti@gmail.com

स्त्रियांमधील (PCOD) वंध्यत्व या आजाराच्या बरोबरीनेच सध्या वाढत जाणारा किंवा दिसून येणारा आजार म्हणजे एंडोमेट्रिओसिस. १० पैकी १ महिला एंडोमेट्रिओसिसची (Endometriosis Symptoms) शिकार असल्याचे आढळले आहे. एंडोमेट्रिओसिस हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. आजकालच्या जीवनशैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढले आहे. जर का कमी स्टेजला त्याचे निदान झाले तर एंडोमेट्रिओसिस बरा होऊ शकतो. एंडोमेट्रिओसिस हा आजकालच्या नवीन लाईफस्टाईलमुळे होणारा आजार आहे. जर त्याचे वेळेवर निदान झाले नाही तर त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर होतो आणि पेशंटना पुढे जाऊन वंध्यत्वाला सामोरे जावे लागते किंवा गर्भपिशवी काढून टाकावी लागते.

एंडोमेट्रिओसिस काय आहे? एंडोमेट्रियम, गर्भाशयाचे सर्वात आतील आवरण, मासिक पाळीत रक्तस्रावात गळून पडते. अंडाशयाचे हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे आतील आवराणाला सेन्सेटिव्ह असतात. एंडोमेट्रियल पेशी गर्भाशयाव्यतिरिक्त अंडनलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढू लागतात. ही एक लक्षणीय वेदनादायी परिस्थिती आहे आणि सहसा एवढी गंभीर आहे की, गर्भाशयातील अवयव एकमेकांशी चिकटू लागतात. एंडोमेट्रिओसिसची कारणे-सर्वात पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे स्ट्रेस, आधुनिक जीवनशैली, अनुवंशिकता धूम्रपान किंवा अल्कोहोल सेवन, वजन अधिक असणे.

हार्मोनल इम्बॅलन्स (Hormonal imbalance) याची मुख्य लक्षणे : असामान्यरित्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव (मॅनोरॅजिया) किंवा लांब काळापर्यंत पाळीदरम्यान रक्तस्राव, वंध्यत्व, वेदनादायी रक्तस्राव किंवा शौच, थकवा (विशेषत: मासिक पाळीदरम्यान). एंडोमेट्रिओसिसचे निदान ः यामध्ये महिलेच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर सिस्ट आहेत का? किंवा गर्भपिशवीच्या मागील भागात स्कार्स आहेत का? किंवा इतर काही अ‍ॅबनॉर्मलिटिज आहेत का? याचे परिक्षण केले जाते. अल्ट्रासाऊंड- चॉकलेट सिस्ट आहेत का? याची माहिती अल्ट्रासाऊंडमध्ये मिळते. MRI( मॅग्नेटिक रेसोननस इमेजिंग)- जेव्हा खूप मोठे सिस्ट असण्याची शंका असेल किंवा कॅन्सरची शंका असेल तर अशावेळी MRI केला जातो. लॅप्रोस्कोपी- ही एक सर्वाधिक वापरली जाणारी पद्धती आहे. या गोष्टी सोनोग्राफीमध्ये पाहणे शक्य होत नाही. त्या गोष्टी लॅप्रोस्कोपीद्वारे निदान करता येतात.

एंडोमेट्रिओसिस प्रतिबंधित करणे संभव आहे. नियमित व्यायामाने एंडोमेट्रिओसिस प्रतिबंधित करू शकतो तसेच स्ट्रेस फ्री राहणे हे अत्यंत महत्वाचा उपचार उपाय आहे. या आजाराचे उपचार महिलांची लक्षणं, गंभीरता, रुग्णाचे वय, आजाराची स्थिती तसंच कालावधीवर अवलंबून अस्ते. या आजाराच्या उपचारांचा उद्देश लक्षणांना दूर करून प्रजनन क्षमता वाढवणं, हा असतो. सगळ्यात आधी औषधांच्या साहाय्याने या आजारावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्यासाठी वेदना निवारक दिले जातात. उपचारांमध्ये गोळ्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात गर्भनिरोधक गोळ्या, प्रोजिस्टिन थेरपी, जीएचा आरएचविरुद्ध आणि अॅंटिऑक्सिडंट इत्यादी दिले जातात.

या रुग्णांना औषधे आणि इंजेक्शनने फायदा मिळत नाही त्यांना स्टेज ३ आणि स्टेज ४ सर्जरीची आवश्यकता असते. ही सर्जरी दुर्बिणीद्वारे केली जाते. या सर्जरीत अंडाशय आणि बाकी अवयवांमध्ये जमा असलेले रक्त काढून टाकलं जातं तसेच इतर ठिकाणी हललेल्या अवयवांना आधीच्या जागी ठेवले जाते. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि गर्भधारणेची क्षमता वाढते. एंडोमेट्रिओसिस हा एक दीर्घकालीन आजार आहे. वेळीच उपचार केले नाहीतर ही समस्या वाढत जाते म्हणून लवकरात लवकर या आजाराचे उपचार करायला हवेत. मासिक पाळीच्यावेळी, शरीर संबंधांच्यावेळी वेदना जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ज्ञ आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT