Heart Attack Symptoms esakal
health-fitness-wellness

Heart Attack Symptoms : हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले; सर्वाधिक 2 हजार 430 रुग्णांचा मृत्यू, तापाच्या साथींचाही प्रभाव

हृदयविकाराच्या (Heart Attack) आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हृदयविकाराने सर्वाधिक २ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये विविध कारणांमुळे १० हजार ८०५ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, गॅस्ट्रो, अतिसार, डेंगी (Dengue), स्वाईनफ्ल्यूने (Swine flu) गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नाही; परंतु हृदयविकाराच्या (Heart Attack) आजाराने सर्वाधिक २ हजार ४३० जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासन साहाय्यित किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधांतर्गत ५ दवाखाने, ६५ प्रसूतीगृह, ६७ प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि ३७८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (Ratnagiri Health Centre) आहेत. या रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू झाले असले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडील माहितीनुसार, साथीच्या आजारांतील हिवताप, विषमज्वर किंवा टायफाईड, डेंगी, स्वाईनफ्ल्यूने एकही मृत्यू झालेला नाही.

शासकीय रुग्णालयांमध्ये वेळेत उपचार केले गेल्याने या आजाराने मृत्यू झालेला नाही. साथीच्या आजारातील क्षयरोगाने ९३ तर श्वसनक्रियेसंबंधित आजाराने ३२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिगरसाथीच्या आजारामध्ये हृदयविकार येतो. या हृदयविकाराने सर्वाधिक २ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी वयातही या विकाराने मृत्यू झाले आहेत.

कर्करोगाने २९४ तर एड्सने २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बाळंतपणात ६ मातांचा मृत्यू झाला आहे. पक्षघाताने ५६७, मूत्रपिंडाच्या आजाराने १ हजार २७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या प्रकारातील मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये ११५ आत्महत्या असून, रहदारी वाहतुकीने १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अपघातांमध्ये १८ मृत्यू झाले आहेत. इतर अनेक कारणांनी मृत्यू होतात. हे मृतदेह शासकीय रुग्णालयांमध्ये आणले जातात. अशा मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. ५ हजार ४६० मृत्यू अशा इतर कारणांमुळे झाल्याची नोंद आहे.

स्पर्धात्मक युग, वाढते ताणतणाव त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार आदी विकार कमी वयोगटातील व्यक्तींमध्येही आढळतात. व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम, योगासने आदींचा अवलंब होत नाही. लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हृदयविकारातून मृत्यू होतात. हे टाळण्यासाठी दिनचर्या व ऋतूचर्या सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. आहारविहाराचे सुंदर वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेद हा एक पर्याय ठरू शकतो.

-डॉ. प्रतीक झिमण, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT