Varai Bhat Benefits esakal
health-fitness-wellness

Varai Benefits : मधुमेहासह वजन घटवण्यासाठी 'ही' वरी ठरते अधिक उपयुक्त; जाणून घ्या काय आहेत फायदे

Varai Bhat Benefits : मधुमेहासह वजन घटवण्यासाठी ही वरी अधिक उपयुक्त ठरते.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात भगर / वरी / वरईची लागवड प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागात होते. वरीला काही भागात वरई / भगर असेही म्हटले जाते.

उपवासात वरीचा भात व शेंगदाण्याची आमटी हे प्रमुख पदार्थ. वरी अर्थात वरई का खाल्ली जाते? त्याचे फायदे काय? सांगलीकरहो, खऱ्या अर्थाने वरीचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रामुख्याने मधुमेहासह वजन घटवण्यासाठी ही वरी अधिक उपयुक्त ठरते.

-डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक संशोधक, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प

महाराष्ट्रात भगर / वरी / वरईची लागवड प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागात होते. वरीला काही भागात वरई / भगर असेही म्हटले जाते. हे पीक प्रामुख्याने उपवासासाठी प्रमुख अन्न म्हणून खातात. याचबरोबर दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहे.

आहारातील महत्त्व

वरी पिकाला असणारे धार्मिक महत्त्व व त्याचबरोबर त्यात असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास सत्वयुक्त धान्य म्हणणे योग्य ठरते. वरी धान्यात स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज व लोह या मूलद्रव्यांचे प्रमाण गहू व भात पिकापेक्षा चांगले आहे. उपवासाला वरीचा भात / भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. त्यामुळे वरी आरोग्यास लाभदायक आहे. वरीचा भात, भाकरी, बिस्किट, लाडू, शेवया, चकली, शेव इत्यादीत केला जातो.

असे आहेत फायदे !

प्रथिने अधिक असल्याने शरीरात शक्ती येते.

कॅलरी कमी असल्याने वजन आटोक्यात राहते.

हलका आहार असल्याने पचनाच्या तक्रारी कमी होतात.

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याने सहज पचते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास उपयोगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT