मुलांची उंची कमी म्हणजे वयानुसार त्यांची उंची वाढत नाही. जंक फूडच्या जमान्यात ही समस्या अधिकच वाढत चालली आहे.
मुलांच्या शारीरिक विकासासाठी काय आवश्यक आहे? होय, निरोगी अन्न! पण मुलांना कोणत्या प्रकारचे निरोगी अन्न (Healthy food) हवे आहे, जेणेकरून त्यांचे शरीर विकसित होईल आणि त्यांची उंची वाढेल? हा एक मोठा प्रश्न आहे. मुलांची उंची कमी म्हणजे वयानुसार त्यांची उंची वाढत नाही. जंक फूडच्या (Junk food) जमान्यात ही समस्या अधिकच वाढत चालली आहे. योग्य वेळी काळजी घेतल्यास शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता दूर करून मुलांची उंची वाढवण्यास आपण मदत करू शकतो. अत्यावश्यक खनिजे फक्त औषधांद्वारेच मुलांना दिली जावीत असे नाही. असे अनेक सुपरफूड (Superfood) आहेत जे आपल्याला मुलांची उंची (Height) वाढवण्यास मदत करू शकतात.(Tips To Increase Height & Stay Healthy)
द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मुलाचा आहार आणि त्याची उंची यांचा थेट संबंध असतो. एवढेच नाही तर पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, दूध, चिकन आणि इतर पदार्थांचे सेवन करणे हा तुमच्या मुलांची उंची वाढवण्यासाठी उत्तम मार्ग आहे.
काही मुलांची उंची का वाढत नाही?(Reasons For Not Increasing Height)
तुम्ही सर्वांनी "संतुलित आहार" बद्दल ऐकले आणि वाचले असेलच. आजची बदलती जीवनशैली आपला संतुलित आहार बिघडवत आहे. मुलांमधील उंची कमी झाल्यामुळे त्यांच्या शरीरात सुरुवातीपासूनच आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दिसून येते.
ज्याप्रमाणे वनस्पतीला वाढण्यासाठी सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे शरीरालाही अशा अनेक पोषक तत्वांची गरज असते. ज्यामुळे शरीराची वाढ होऊ शकते. लहानपणापासून मुलांना संतुलित आहार देऊन आपण आपल्या मुलांच्या या समस्येवर मात करू शकतो. त्यांना नियमित थोड्या थोड्या वेळाने खायला द्या, कारण लहान मुले प्रौढांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह असतात.
उंची वाढवण्यासाठी तुम्हाला मुलांच्या आहारात या चार पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल
- खनिजे पदार्थ (Minerals)
- जीवनसत्त्वे (Vitamins)
- प्रथिने (Protein)
- कर्बोदके (Carbohydrates)
हे सर्व पोषक तत्त्वे कोणत्या सुपरफूडमधून मिळू शकतात ते पाहूयात
सोयाबीन (Soybean) :
सोयाबीन किंवा सोया चंक्स हा एक प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. जर आपण प्रथिनांच्या शाकाहारी स्त्रोतांबद्दल बोललो तर सोयाबीन पहिल्यांदा येतो. इतर पदार्थांच्या तुलनेत यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. खास गोष्ट अशी आहे की, तुमच्या मुलांसमोर ते सर्व्ह करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, कारण त्यांची चव खूप उत्तम असते आणि तुम्ही त्यांच्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता. हे फायबर आणि व्हिटॅमिन सी चा देखील चांगला स्रोत आहे.
दूध (Milk) :
दुधाचे गुणधर्म तुम्हा सर्वांना माहीत असतीलच. कारण लहानपणापासून तुम्हाला सकाळी आणि रात्री दूध पिण्याचा सल्लाही दिला जात असेलच. होय, ही वेगळी बाब आहे की बाळांना दूध पाजणे हे खूप अवघड काम आहे. जेव्हा पोषक तत्वांचा विचार केला जातो तेव्हा दूध ही कमतरता भरून काढू शकते.
हिरव्या पालेभाज्या (Vegetables) :
मुलांच्या शारीरिक विकासासाठी हिरव्या भाज्या खूप फायदेशीर असतात, कारण हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-के चांगल्या प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करते आणि उंची वेगाने वाढवण्याचे काम करते. दिवसाच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा आहार असणे आवश्यक आहे.
ड्रायफ्रूट्स (Dried fruits) :
मुलांची उंची वाढविण्याचा विचार केला तर शरीराला पोषणासोबतच भरपूर ऊर्जा लागते. यामध्ये ड्रायफ्रूट्स, विशेषत: बदाम खूप मदत करू शकतात. उन्हाळा असेल तर रात्री भिजवलेले बदाम आणि हिवाळा असेल तर साधे बदाम वाढीस खूप मदत करतात. सुकामेवा आणि बिया हे खनिजे, निरोगी चरबी आणि अमीनो अॅसिडचे समृद्ध स्त्रोत आहेत.
फळे (Fruits) :
फळे ही निसर्गाची देणगी आहे, जी अनेक खनिजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आपल्या आहारात फळे असणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच भाज्यांचे सेवन करणेही महत्त्वाचे आहे. मुलांची उंची वाढविण्याचा विचार केला तर फळे हे एक उत्तम माध्यम आहे. ज्याद्वारे आपण त्यांना आवश्यक पोषक तत्वे पोहोचवू शकतो. मुलांना गोड फळे खूप आवडतात. तुम्ही मुलांना फ्रूट चाटच्या रूपात फळे खायला देवू शकता.
याची विशेष काळजी घ्या :
मुलांमध्ये उंची कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव. मात्र, केवळ यामुळेच त्यांची उंची वाढत नाही, असे नाही. बाळांना त्यांची झोप योग्य प्रकारे मिळत आहे याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणे फायदेशीर असते. आपल्या सभोवतालच्या गोष्टींमधून आपल्याला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी असे अनेक घटक मिळतात. मुलांच्या वाढीसाठी देखील हे खूप महत्वाचे आहे.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.