Diet Sakal
health-fitness-wellness

हेल्थ वेल्थ : लठ्ठपणा आणि उपाययोजना

लठ्ठपणा हा अनेक आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण आहे किंवा त्याच्याशी संबंधित तरी असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त चरबी असते, तेव्हा लठ्ठपणा येतो.

सकाळ वृत्तसेवा

लठ्ठपणा हा अनेक आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण आहे किंवा त्याच्याशी संबंधित तरी असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त चरबी असते, तेव्हा लठ्ठपणा येतो.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

लठ्ठपणा हा अनेक आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण आहे किंवा त्याच्याशी संबंधित तरी असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त चरबी असते, तेव्हा लठ्ठपणा येतो. हे कसे घडते हे समजून घेण्यासाठी, एखाद्या ट्रेनच्या इंजिनाप्रमाणे आपल्या शरीराची कल्पना करा, ज्यात तुम्ही इंधन भरता. इंजिन किती इंधन वापरणार हे ट्रेन किती अंतर पार करणार यावर अवलंबून आहे आणि भविष्यातील वापरासाठी त्यानुसार उर्वरित तेल साठवले देखील जाते. त्याचप्रमाणे धावणे, चालणे, झोपणे, अन्न पचवणे इत्यादी विविध क्रिया करण्यासाठी आपण खातो त्या कॅलरीजमधून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

इंजिन आणि आपल्या शरीरात फरक हा आहे, की इंजिन एकदा सुरू झाल्यावर साठवलेले तेल नक्कीच वापरेल परंतु आपल्या शरीरात जमा झालेल्या आणि वापरल्या जात नसलेल्या अतिरिक्त कॅलरी चरबीच्या रूपात जमा होतात. या साठ्यामुळे शरीरातील चरबीत वाढ होते ज्याला आपण वजन वाढणे म्हणतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, गरजेपेक्षा जास्त वजन हे हृदयविकार, मधुमेह यांसह इतर अनेक आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण ठरते.

तुमचे ही वजन अधिक असल्यास किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमची मदत हवी असल्यास ह्या लठ्ठपणाच्या समस्येचे निराकरण कसे करायचे ते आता समजून घेऊ. लठ्ठपणाचे व्यवस्थापन कसे करावे?

लठ्ठपणा घालवण्याचा एक मार्ग म्हणजे कॅलरीज कमी खाणे. याचा अर्थ असा की, आपण जेवढ्या कॅलरीज वापरतो/ जाळतो त्यापेक्षा कमी कॅलरीज खाणे आवश्यक आहे. हे इतके सोप्पे असते, तर आणि काय हवे होत हे आपल्या सर्वांना वाटते, बरोबर? तर, कॅलरीज कमी करण्यास आणि वजन कमी होण्यास काय काय मदत करते ते पद्धतशीरपणे समजून घेऊया.

कॅलरीज कमतरता = कॅलरीजचा वापर - कॅलरीजचे सेवन

आहारात बदल करून आणि पुरेसा नियोजित व्यायाम करून कॅलरीज अधिकाधिक जाळता येऊ शकतात. तुम्ही या दोन्हींमध्ये संतुलन कसे साधू शकता ते पाहूया.

कमी खा (कॅलरीजचे सेवन कमी ठेवा)

तुम्ही तुमच्या आहारात खालील बदल करू शकता. दररोज आपल्या जेवणाचा आकार १० ते १५ टक्के कमी करणे. उदाहरणार्थ, तुम्ही साधारणपणे इतर दिवशी चार चपात्या खात असाल, तर तुम्ही तुमच्या जेवणात एक चपाती कमी खाऊ शकता. तुम्हाला अधेमधे खायची सवय असेल, तर ते कमी होईल ह्यावर लक्ष द्या आणि तुम्ही चिप्स, सामोसे आणि ह्यासारख्या इतर तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी ठेवण्यासह रिफाइंड पीठापासून (मैदा) बनवलेल्या पदार्थांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. साखर हा आणखी एक घटक आहे जो बहुतेक पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये, तसेच पेयांमध्ये असतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचे सेवन कमी कराल याची काळजी घ्या. उदाहरणार्थ, कोका कोलामध्ये साखर भरलेली असते.

तूप आणि तेल यांसारख्या स्निग्धांशाचे सेवन तुम्ही दिवसातून ३-४ चमचे, स्वयंपाक करताना आणि टॉपिंगसाठी वापरून मर्यादित ठेऊ शकता.

अधिक हालचाल करा (कॅलरी खर्च करणे) - नियमितपणे व्यायाम करणे, ज्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात, हा कॅलरीज कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपण खालील मार्गांनी शारीरिकरित्या सक्रिय राहू शकता:

  • तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियोजित व्यायामाचा समावेश करा. ६० मिनिट वेगाने चालायला जाणे किंवा तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम केल्याने तुम्हाला पुरेशा कॅलरी जाळण्यास मदत होईल. आठवडाभर मध्यम तीव्रतेने ४-५ दिवस वेगाने चालण्याचे ध्येय ठेवा.

  • तुम्ही दिवसभर सक्रिय असल्याची खात्री करा. संधी मिळताच बसू किंवा झोपू नका. त्याऐवजी, दिवसभर चालणे, उभे राहणे किंवा शफल करत रहा.

  • दैनंदिन घरगुती कामे करणे, फिरणे, उभे राहणे, हात पाय हलवणे यामुळे कॅलरीज बर्न होतात.

लठ्ठपणा कमी नाही केल्यास?

मला खात्री आहे, की तुम्हाला आधीच माहीत आहे की तुमचा लठ्ठपणा व्यवस्थापित करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. वजन जितके जास्त असेल तितका तुमचे सांधे, हाडे, स्नायू, हृदय, आणि इतर सर्व अवयवांवर जास्त भार पडेल आणि विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता देखील वाढेल. तंदुरुस्त राहण्याच्या छोट्या-छोट्या आणि नियमित प्रयत्नांनी जर वजन कमी करणे सहज शक्य होणार असेल तर ते गुंतागुंतीचे का बनवायचे - नाही का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोठी मदत; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

Gold Price Today: सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण का झाली?

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी तब्बल 1 लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

SCROLL FOR NEXT