पुणे : रेजिस्टन्स पाॅवर वाढवण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात 'क' जीवनसत्व जाणं गरजेचं आहे. 'क' जीवनसत्वाचे फायदे, त्याची शरीरात कमतरता असल्यास कसं ओळखावं, कोणत्या भाजीत किंवा फळांमध्ये 'क' जीवनसत्व असते, ते किती प्रमाणात असतं, याविषयी सविस्तर जाणून घ्या.
कोरोना व्हायरसला हरवायचं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. 'क' जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. 'क' जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुरळीतपणे पार पडते. 'क' जीवनसत्वामुळे शरीराला अॅटी ऑक्सिडेंट पुरेशा प्रमाणात मिळतात. बीपी नियंत्रणात येतं.
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयासंबधित आजारांचा धोका कमी करतं. शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्याचं काम 'क' जीवनसत्व करतं. तसंच गाठी असल्यास त्या कमी करण्यास मदत करतं. लोहाचं प्रमाण कमी असल्यास 'क' जीवनसत्वामुळे ती भरून निघते. तसेच अन्नपदार्थातून लोह शोषण्यास मदत करतं.
अशावेळी तुमचं डाएट असं असावं...
रोज आहारातून 'क' जीवनसत्व योग्य प्रमाणात पोटात जाणं गरजेचं आहे. यासाठी डाएट अश्याप्रकारे असावं,
सकाळी (६-७ वाजण्याच्या दरम्यान) : गरम किंवा साध्या पाण्यात अर्धा/ एक लिंबू पिळून ते पाणी प्या.
नाश्ता(९-१० वाजण्याच्या दरम्यान) : नाश्त्याला एक पदार्थासोबत (मूग डाळीचं घावन, इडली, डोसा, बाजरीची भाकरी यातील काहीही) सोबत एक अंड आणि एक प्लेट सलाड घ्या. कैरीची चटणी देखील खाऊ शकता.
फावल्या वेळेचा खाऊ...
-मिळेल ते कोणतंही एक फळ खाऊ शकता.
दुपारचं जेवण( १-२ वाजण्याच्या दरम्यान) : वरण भात, पोळी, एक वाटी पालेभाजी, एक प्लेट सलाड खाऊ शकता. तसंच कैरीच्या चटणीचाही समावेश करा.
अल्पोपहार : भाजलेले चणे आणि एक फळ खाऊ शकता. रात्रीचे जेवण(८-९ वाजण्याच्या दरम्यान) : वरण भात, पोळी, भाजी आणि सलाड खावं.
वजन कमी करणाऱ्यांसाठी खास टीप
सलाड दिवसातून एकदा घेतलं तरीही पुरेसं आहे. त्यामध्ये टोमॅटो, कांदा, गाजर, काकडी आणि अर्ध्या लिंबाचा रस असावा. यामुळे शरीराला 'क' जीवनसत्व मिळेल. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी रात्री किंवा दुपारच्या जेवणाआधी सलाड खावं. यामुळे शरीरातील कॅलरी कमी होतील आणि वजन कमी करायला मदत होईल.
तुम्हाला 'क' जीवनसत्वाची कमतरता आहे का नाही हे कसे ओळखावं... ?
वातावरणातील बदलामुळे तुम्ही आजारी पडत असाल तर ते 'क' जीवनसत्वाची कमतरता असल्याचं लक्षण आहे. म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. 'क' जीवनसत्वाची कमतरता खालील लक्षणांद्वारे ओळखू शकता.
महिन्यातून एक-दोन वेळा सर्दी-तापाचा त्रास होणं, थकवा जाणवणं, महिन्याभरात ३-४ किलो वजन अचानक कमी होणं, केसगळती, हिरड्या कमकुवत होणं, उच्च रक्तदाब, जखम लवकर न भरणं इत्यादी...
जास्त सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम...
तसंच 'क' जीवनसत्वाचं जास्त प्रमाणात सेवन होणं देखील शरीराचं नुकसानदायक ठरतं. 'क' जीवनसत्वाचं प्रमाण जास्त झाल्यास किडनी स्टोन, पोटात जळजळ, जुलाब अशी लक्षणं दिसून येतात.
'क' जीवनसत्व पाण्यात विरघळून जातं. त्यामुळे शरीरात साठत नाही. म्हणून दररोज शरीरात आवश्यक प्रमाणात 'क' जीवनसत्व जाणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज ६५-९० ग्रॅम 'क' जीवनसत्वाचं सेवन करणं आवश्यक आहे.
फळभाज्यांचे करा सेवन
लिची- ७१.५ एमजी (दोन ते तीन लिची), स्प्राऊट्स- ६० ते ८० एमजी, पपई- ६० एमजी, स्ट्रॉबेरी- ५९ एमजी, संत्र- ५५ एमजी, लिंबू- ५३ एमजी, अननस- ४७. ८ एमजी,डाळी- ३५ ते ४० एमजी, आंबा- ३५ एमजी, कैरी- २७. ७ एमजी, टोमॅटो- २५ एमजी, बटाटा- १९. ७ एमजी , जांभळं- १४. ३ एमजी (नऊ ते दहा जांभळं), कांदा- १३.७ एमजी
असे हे प्रमाण 'क' जीवनसत्त्वांचे असते .
संपादन - सुस्मिता वडतिले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.