vitamin d 
health-fitness-wellness

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व-ड आवश्यक, जाणून घ्या कसे मिळवायचे

सकाळ वृत्तसेवा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणं आणि आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शरिराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व-ड महत्वाची भूमिका बजावतं. जीवनसत्व-ड मांसपेशी, हाडांचा विकास, प्रतिकारशक्ती आणि कोशीका वृद्धीसाठी आवश्यक असते. तसेच कॅल्शियमला पचवण्यासाठी जीवनसत्व-ड अतिआवश्यक असते. 

-जीवनसत्व-ड कमी होणं म्हणजे नेमकं काय होतं...

20ng/ml पेक्षा कमी स्तर असणाऱ्या लोकांमध्ये जीवनसत्व-ड ची कमी असल्याचं म्हणलं जातं, तर 30ng/ml पर्यंत स्तर असणाऱ्यांना निरोगी मानलं जातं.

-जीवनसत्व-ड कमी असण्याचे लक्षणे...

थकवा, तणाव, हाडं दुखणे, केस गळणे, जखम भरुन येण्यास वेळ लागणे, मुड स्विंग्स, छोट्याश्या माराने हाड तुटणे, विशेष करुन जांघ आणि बसण्याच्या जागी दुखणे...

-शरिराला किती जीवनसत्व-ड लागते...

एनसीबीआईनुसार प्रत्येक व्यक्तीला दिवसातून 10 ते 20 मायक्रोग्रॅम जीवनसत्व-ड ची आवश्यकता लागते. यापेक्षा कमी जीनवसत्व शरिराला मिळाल्यास आरोग्याच्या समस्या सुरु होतात.

-जीवनसत्व-ड च्या कमतरतेचे कारण...

जास्त सनस्क्रीनचा वापर करणे, उन्हात न शेकणे, प्रदुषण, घरात जास्तवेळ राहणे, जीवनसत्व-ड असणारा आहार न घेणे यामुळे जीवनसत्व कमी होऊ शकते. 

-जीवनसत्व-ड ची कमतरता कशी दूर कराल...

दररोज 10 ते 30  मिनिटं सुर्याच्या कोवळ्या उन्हात थांबलं पाहिजे. उन्हात थांबण्याचा वेळ तुमच्या त्वचेच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असेल.

जीवनसत्व-ड ने भरपूर असलेला आहार घ्यावा. मासे, अंडी, कॉड लिवर तेल, मशरुम, ओयस्टर्स इत्याही जीवनसत्व-ड युक्त आहार आहे.

दरम्यान, जीवनसत्व ड कमी असल्याची लक्षणे तुमच्यात दिसून येत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT