Ways for rising early in the morning read full story 
health-fitness-wellness

सकाळी लवकर उठायचे आहे, पण मन मानत नाही; करून बघा काही उपाय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : झोप हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात झोप जर पहाटेची असेल तर ती प्रत्येकाला हवीहवीशी असते. सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. या दिवसांत रात्र कशी संपली हे कळतही नाही. पहाटेची झोप कधी संपूच नये असे वाटते. परंतु, आपली दिनचर्या चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठून व्यायाम, योग, प्राणायाम करणे गरजेचे आहे.

तुमची सकाळची सुरुवात कशी होते, यावर तुमच्या दिवसाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे सुदृढ आरोग्य हवे असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठावे लागेल. पहाटेच्या झोपेवर कसा मिळवायचा विजय, याबाबत जाणून घेऊया...

पहाटे लवकर उठण्याच्या बाता करून रात्री झोपी जाणाऱ्या भल्याभल्यांना बऱ्याच प्रयत्नांनंतरही सकाळी लवकर उठता येत नाही. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण  तुम्हाला अशा काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्यांच्या सहाय्याने तुम्हाला सकाळी उठण्यास त्रास होणार नाही. वास्तविक सकाळी उठण्याचे बरेच फायदे आहेत. सकाळी आपला मेंदू अधिक ताजा असतो. विद्यार्थ्यांसाठी सकाळचा वेळ अभ्यासासाठी खूप फायदेशीर आहे. 

कोणतीही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. सकाळी आपल्याला कोणताही विषय समजणे सोपे होते आणि आपण जे वाचले आहे ते बऱ्याच काळासाठी लक्षात राहते. सकाळचा वेळ विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी चांगला आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लवकर कसे उठता येईल, यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. काही लोक कदाचित त्यांच्या अवलंबिलेल्या प्रयत्नात यशस्वी झाले असतील तर काही अयशस्वी. वास्तविक, काही महत्वाच्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून सकाळी लवकर उठून यश मिळवता येते.

दिनचर्येत अचानक बदल करू नका

सकाळी लवकर उठण्याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सुरुवातीला पहाटे उठण्याची वेळा एकदम फिक्स करू नका. हळूहळू तुमच्या दररोजच्या उठण्याची वेळा कमी कमी करा. जर तुम्ही आज ठरवले आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे उठायला लागले तर तुमचे शरीर तुम्हाला साथ देणार नाही. यासाठी दररोज किंवा आठवड्यात १५-१५ मिनिटे आधी उठायचा प्रयत्न करा. त्यामुळे काही दिवसांत तुम्हाला पहाटे उठण्याची सवय होईल. परंतु एकदा आधी उठण्याची सवय केली तर ती कदापि बदलू नका. कारण तसे केल्याने तुम्ही अधिक आळशी व्हाल.

वेळेचे महत्त्व जाणा

सकाळी लवकर उठण्यासाठी सर्वप्रथम वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. कारण वेळेचे नियोजन केल्याशिवाय तुम्ही कदापि लवकर उठू शकत नाही. केवळ पहाटे उठण्यासाठीच नव्हे तर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करून त्यानुसार वागणे यशस्वी जीवनाचे पहिले सूत्र आहे. गेलेली वेळ तुमच्या जीवनात कधीच परत येत नाही. त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण विचारपूर्वक सत्कर्णी लावा. 

दररोजची झोपण्याची वेळ निश्चित असावी

आपला उद्याचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्हाला आजची रात्र चांगली करावी लागेल, अर्थात तुमच्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असाव्या. आजच्या सोशल मीडियाच्या काळात बऱ्याच जणांना रात्री नेटसर्फिंग केल्याशिवाय झोपच येत नाही. त्यामुळे अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असतात, परिणामी त्यांचा दुसरा दिवस खराब होतो. पहाटे लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. काहीही झाले तरी प्रत्येकाने सहा ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. ज्या दिवशी रात्री तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल त्या दिवशी नियमित झोपेपेक्षा एक तास आधी झोपा. यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी अधिक ताजेतवाने वाटेल.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला लवकर उठलेच पाहिजे. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो. विशेष म्हणजे मोठ्यांसोबत मुलांनीही पहाटे उठण्याची सवय ठेवली पाहिजे. कारण अभ्यासाच्या दृष्टीने पहाटेची वेळ अधिक चांगली आहे. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पहाटे लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे ही जीवनशैली आत्मसाद केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT