health-fitness-wellness

प्राणायाम म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ

योगाभ्यासात प्राणायाम करण्याला फार महत्त्व आहे.

देवयानी एम., योगप्रशिक्षक

Breath is not just air, it is Life! असं कायम म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे केवळ शरीरात हवा भरणं नाही. तर, श्वास घेण्याचीदेखील एक पद्धत आहे. जर आपण योग्य रितीने श्वासोच्छवास केला, तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. विशेष म्हणजे योगाभ्यासातही प्राणायाम करण्याला फार महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग्यरितीने श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे शिकू शकतो. परंतु, त्यापूर्वी प्राणायाम म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.(what-is-pranayama-health benefits-yoga-and-pranayama)

कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पाहा. आपल्या मनाच्या अवस्थेचा श्वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल, तेव्हा श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मन आणि श्वासाच्या या नात्यामुळे प्राणायामाचा अभ्यास गरजेचा आहे. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो. ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितलं, तर ते होणं खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासनतास भटकत राहू. श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायाम.

प्राणायामाचा अर्थ

निरोगी मनुष्य मिनिटाला साधारण १५ वेळा श्वास घेतो, म्हणजे दिवसाला २१ हजार ६०० वेळा. महर्षी पतंजली म्हणतात, ‘‘या नैसर्गिक गतीचा विच्छेद (breaking the pattern) म्हणजे प्राणायाम. मग तो मिनिटाला पंधरापेक्षा जास्त म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे. श्वासोच्छवासाला स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक, प्रमाणबद्ध, विशिष्ट फळाच्या उद्देशाने बदल करणे म्हणजे प्राणायाम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT