Omicron Covid Variant : जसे तुम्ही कोरोना किंवा इतर कोणत्याही व्हेरिअंटपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेता तशीच काळजी आताही घ्या. तुम्ही जर अजून लसीकरण केले नसेल तर करून घ्या. तुम्ही जर बुस्टर घेण्यास पात्र असाल तर घ्या आणि मास्क(Mask) वापरणे, गर्दी टाळणे अशा कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या नियमांचे पालन करा. ओमीक्रॉनकडे सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे, कारण, अनेक ठिकाणी अति- संसर्गजन्य डेल्टा व्हेरिअंटमुळे अति संसर्गजन्य डेल्टा व्हेरिअंटमुळे (Delta Variant) संसर्ग वाढत आहे.
''डेल्टा हा सध्या खूप मोठा धोका आहे. ओमीक्रॉन (Omicron Variant ) हा अनिश्चित धोका आहे,'' असे यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉ फ्रान्सिस कॉलिन्स यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले. कोरोना व्हायरसचा कोणता प्रकार आहे याकडे दुर्लक्ष करत आहे की, आम्हाला माहित की काय करावे'' (How can I protect myself from the new Omicron Covid variant)
मुख्य घटकांबाबत जाणून घेण्यासाठी या नव्या व्हेरिअंटचा आणखी काही आठवडे अभ्यास करावा लागेल. हा व्हेरिअंट आणखी संसर्गजन्य आहे का? त्यामुळे गंभीर आजारपण येऊ शकते किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते का आणि होत असेल तर कितपत होऊ शकते.
दरम्यानच्या काळात आपल्याला सुरक्षेच्या पातळी आणखी वाढवायला हवी, विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्ही प्रवास करत असाव किंवा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाता तेव्हा. '' असे अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग सोसायटीच्या डॉ ज्युली वैशंपायन यांनी सांगितले.
बुस्टर शॉट हा एक सुरक्षा वाढविण्याचा उपाय आहे. आणखी एक डोस घेतल्यामुळे विषाणु विरुद्ध लढणारी अँन्टबॉडिज वाढविण्यासाठी मदत होते. जरी या अन्टीबॉडिज इतर व्हेरिअंटप्रमाणे ओमीक्रॉनच्या बाबतीत तितक्या प्रभावी नसल्या तरी आणखी एक डोस घेतल्यामुळे डेल्टा विरुद्द संरक्षण वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
त्याचबरोबर, मास्क वापरणे, गर्दी टाळणे, आणि हवा खेळती ठेवण्यासाठी सुधारणा करणे, टेस्टिंग करून घेणे हे देखील सुरक्षा वाढविण्यासाठी आणखी एक पाऊल आहे. ज्यांना कोरोना संक्रमणाची लक्षणे दिसत आहे किंवा संभाव्य धोका आहे अशांना हाच सल्ला दिला जातो. पण त्यामुळे सुट्टीच्यी दिवशी होणारे भेटींपूर्वी जरी उपस्थित असलेल्यांपैकी सर्वांचे लसीकरण झाले नसले तरी सुरक्षितेची खात्री करण्यास मदत होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.