जगभरात कोरोनाची दहशत सातत्याने वाढत आहे. नवीन रुग्ण दररोज समोर येत आहेत. लस हे कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी लसीकरण हे प्रमुख शस्त्र मानले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा शरीरावर (Body) होणारा दुष्परिणाम कमी होतो, असे मानले जाते. पण एका नव्या संशोधनानुसार(Reserch) , कोरोनाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी रेड वाईन (Red Wine) सर्वोत्तम उपाय ठरत आहे. (Red Wine Helps to Prevent Coronavirus)
नियमित रेड वाईन पिणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाचा कमी धोका असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेले संशोधन, ब्रिटीश डेटाबेस यूके बायोबँकमधून करण्यात आले आहे. त्याचे विश्लेषण चीनमधील शेन्झेन कांगनिंग हॉस्पिटलमध्ये विश्लेषण करण्यात आले आहे.
असे केले संशोधन
डेली मेलने अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की जी लोकं दर आठवड्याला पाच ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक रेड वाईन पितात, त्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचा धोका हा 17 टक्के कमी असतो. त्याचाच अर्थ रेड वाईनच्या नियमित सेवनामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते. तसेच त्यात असणारे घटक हे कोरोनाला संपवण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असंही संशोधनातून दिसून आले आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार रेड वाईनमध्ये असणाऱ्या पॉलिफेनॉल हा घटक त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. या घटकामुळे कोरोना किंवा श्वसनसंस्थेवर परिणाम करणाऱ्या सर्वच व्हायरसचा प्रभाव कमी होत असल्याचं संशोधनात दिसले आहे.
इतर पेयांचा परिणाम
रेडपेक्षा व्हाईट वाईनमध्ये हा घटक तुलनेनं कमी असतो. त्यामुळे आठवड्यातून चार ग्लास व्हाईट वाईन पिणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही 8 टक्के कमी असते. मात्र व्हाईट वाईन ही रेड वाईनपेक्षा कमी प्रभावी ठरते, बिअर किंवा इतर मद्यपानामुळे कोरोनाची शक्यता बळावते, असेही संशोधनात म्हटले आहे. इतर अल्कोहोल पेय प्यायल्याने कोरोना होण्याची शक्यता 28 टक्के वाढते असंही हे संशोधन सांगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.