World Health Day esakal
health-fitness-wellness

चुकीच्या आहार पद्धतीमुळं मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांची संख्या वाढतेय; 'आरोग्य'च्या सर्वेक्षणातून माहिती समोर..

गेल्या दोन वर्षात रक्तदाब (Blood Pressure) व मधुमेहावरील (Diabetes) औषधांच्या मागणीही वाढ झाली आहे.

मिलिंद देसाई

ग्रामीण व शहरी भागात मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

World Health Day : बदलती जीवनशैली (lifestyle) आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. तर सरकारनेही आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य खात्यातर्फे (Health Department) नोव्हेंबर महिन्यात बेळगाव जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. सर्वेक्षणावरून रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

लोकसंख्या आधारित सर्वेक्षणानुसार (एनसीडी) प्राथमिक, तालुका व जिल्हा आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यासाठी १९ लाख ८० हजार ९८० जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ७,०४,११८ जणांची रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली होती. यात रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षात रक्तदाब (Blood Pressure) व मधुमेहावरील (Diabetes) औषधांच्या मागणीही वाढ झाली असून याकाळात जिल्ह्यात रक्तदाबाचे २५ टक्के तर मधुमेहाचे १४ टक्के रुग्ण वाढले आहेत.

सर्वेक्षणावेळी मूत्रपिंड, हृदयरोग, कावीळ, मूळव्याध या आजारांच्या रुग्णातही वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. सर्व प्राथमिक केंद्रांमध्ये ईसीजीसह इतर प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या आधारे (एनसीडी) सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये १३ लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यावेळी पंधरा टक्के लोकांना मधुमेह व रक्तदाब असल्याची माहिती पुढे आली. ग्रामीण व शहरी भागात मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. दरवर्षी वर्षातून एकदा आरोग्य खात्याकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येते. त्यानंतर विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या जातात.

-डॉ. एम. एस. पल्लेद, जिल्हा रोग नियंत्रणाधिकारी

आरोग्याकडे दुर्लक्ष नको

व्यस्त कामामुळे अनेकजण वेळेत जेवण करण्याकडे तसेच विश्रांती घेण्याकडे दुर्लक्ष करतात. मोबाईलच्या अतिवापरामुळेही आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे. लहानसहान गोष्टीवरून नागरिकांमध्ये चिडचिडपणाही वाढत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःहून घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

बेळगाव जिल्ह्यांतील रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण

विभाग रक्तदाब मधुमेह

  • अथणी ३,८८४ ३,५९९

  • बैलहोंगल ८,८४९ ७,६५२

  • बेळगाव ७,१०९ ४,२६३

  • चिक्कोडी ४,५२१ ४,०२०

  • गोकाक ५,९१५ ४,६६८

  • हुक्केरी ९,३८४ ७,५००

  • खानापूर ४,९७४ ४,२१४

  • रायबाग ६,५२५ ६,०९६

  • रामदुर्ग ४,७२६ ४,१४७

  • सौंदत्ती ८,५१० ७,०२७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT