Global Immunization Campaign  sakal
आरोग्य

Global Immunization Campaign : भारतात १६ लाख बालके लशीपासून वंचित;‘डब्लूएचओ’चा अहवाल,जागतिक लसीकरण मोहीम ठप्प

रोगप्रतिबंधत लसीकरणात जगभरात सातत्याने घट होत आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये जागतिक लसीकरण मोहीम ठप्प झाली, असे जागतिक हवामान विभाग (डब्लूएचओ) आणि ‘युनिसेफ’ यांच्या संयुक्त अहवालात नमूद केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : रोगप्रतिबंधत लसीकरणात जगभरात सातत्याने घट होत आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये जागतिक लसीकरण मोहीम ठप्प झाली, असे जागतिक हवामान विभाग (डब्लूएचओ) आणि ‘युनिसेफ’ यांच्या संयुक्त अहवालात नमूद केले आहे. यामध्ये भारतातील १६ लाख बालकांचे लसीकरण झालेले नाही. गेल्या वर्षी कोणतीही लस न घेतलेल्या बालकांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘डब्लूएचओ’चा हा अहवाल सोमवारी (ता.१५) प्रकाशित केला आहे. यामध्ये भारताआधी नायजेरियाचे नाव आहे. त्या देशात २०२३ मध्ये लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांची संख्या २१ लाख होती. जागतिक लसीकरणातील क्रमवारीत भारताची स्थिती २०२१ पासून सुधारणा झाली आहे. त्यावेळी भारतातील २७.३ लाख बालके लसीपासून वंचित होती. भारतानंतर इथिओपिया, कांगो, सुदान आणि इंडोनेशिया आदी देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खालावले आहे.

अहवालातील निरीक्षणे

  • २०१९ मधील कोरोनाच्या साथीपूर्वीच्या तुलनेत २०२३ मध्ये २७ लाख बालके लशीपासून वंचित

  • लस न घेतलेल्या मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका

  • शून्य लसीकरणातील २० देशांच्या क्रमवारीत चीनचा १८ वा तर पाकिस्तानचा दहावा क्रमांक

  • लसीकरण न झालेल्या बालकांच्या २०२१मधील संख्येच्या आधारे २० देशांना ‘लसीकरण मोहीम२०३०’ साठी प्राधान्य

  • भारतात गोवरप्रतिबंध लशीचा पहिला डोस (एमसीव्ही१) न घेतलेल्या बालकांची संख्या २०२३मध्ये १६ लाख होती. यात देशाचा क्रमांक तिसरा होता

  • राष्ट्रीय लसीकरण धोरणानुसार साधारणपणे नऊ किंवा १२ महिन्यांच्या बालकांना ‘एमसीव्ही१’ लसीकरण केले जाते. यात ९३ टक्क्यांपर्यंत घट

  • लसीकरणाचे प्रमाण २०१९ पेक्षाही ९३ टक्के होते. २०१३ मध्ये ते आणखी कमी झाले.

ताज्या पाहणीवरून असे दिसत आहे, की अनेक देशांमध्ये लशीपासून वंचित राहणाऱ्या बालकांचे प्रमाण मोठे आहे. ही दरी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. प्रत्येक मुलाला लस मिळण्यासाठी सरकारप्रमाणेच प्राथमिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणारे स्थानिक नेते, भागीदार आणि कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.

- कॅथरिन रुसेल, कार्यकारी संचालक, युनिसेफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT