Vitamin C Supplements  esakal
आरोग्य

Vitamin C Supplements : 3 पैकी २ ग्राहकांचा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी सप्लीमेंटवर विश्वास, सर्वेक्षणातून समोर आली माहिती

Vitamin C Supplements : कोरोना महामारीनंतर जगभरातील व्यक्ती आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vitamin C Supplements : कोरोना महामारीनंतर जगभरातील व्यक्ती आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. अनेक व्यक्तींच्या आरोग्याशी संबंधित गरजांना उत्तम प्रकारे जाणून आणि समजून घेण्यासाठी अ‍ॅबॉट या जागतिक हेल्थकेअर कंपनीने आयपीएसओएससोबत सहयोगाने एक सर्वेक्षण केले आहे.

या सर्वेक्षणाचे नाव आहे ‘हेल्दी लिव्हिंग : द रोल ऑफ व्हिटॅमिन सी’. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या काही गोष्टी त्यांनी सादर केल्या आहेत. कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणामधून असे निर्दशनास आले आहे की, १० पैकी जवळपास ७ व्यक्तींचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असण्यासोबतच ऊर्जा पातळी देखील चांगली आहे.

या व्यक्ती कोणत्याही वेदनेशिवाय नियमितपणे व्यायाम करतात. यातील बहुतांश व्यक्ती या उत्तम आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी ची पातळी शरीरात योग्य प्रमाणात राखण्याचा प्रयत्न देखील करतात. व्हिटॅमिन सी सप्लीमेंट्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

या संदर्भात बोलताना अ‍ॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे असोसिएट डायरेक्‍टर डॉ. कार्तिक पितांबरन म्‍हणाले की, ''व्हिटॅमिन सी मुळे व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. व्हिटॅमिन सी युक्‍त सप्‍लीमेंशन श्‍वसनविषयक आजारांना प्रतिबंध आणि उपचार करण्‍यासाठी ओळखले जाते आणि त्‍याचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत. आमच्‍या सर्वेक्षणामधून एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये व्हिटॅमिन सीची भूमिका निदर्शनास येते.''

''व्हिटॅमिन सीचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत. जसे शरीराची रोगप्रतिकारकशक्‍ती आणि हाडे मजबूत करण्याचे काम व्हिटॅमीन सी करते. व्हिटॅमीन सी मुळे जखम लवकर बरी होण्‍यास मदत होते, हिरड्या आरोग्‍यदायी राहतात. म्हणून, व्हिटॅमिन सीच्‍या कमतरतेमुळे अपूर्ण पोषण मिळते,'' असे मुंबईतील सुचक हॉस्पिटलचे कन्‍सल्टिंग फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्‍ट डॉ. केतन मेहता म्‍हणाले.

मेहता पुढे म्‍हणाले की, ''व्हिटॅमिन सीचे सतत सेवन केल्‍यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती मजबूत होण्‍यासह मधुमेह सारख्‍या असंसर्गजन्य आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फायदा देखील होतो, ज्‍यांना कदाचित उच्‍च प्रमाणात व्हिटॅमिन सी ची गरज भासू शकते.'' 

आयपीएसओएसने मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, चेन्‍नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, अहमदाबाद आणि पुणे या ९ शहरांमधील २,००० हून अधिक व्‍यक्‍तींचे सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणातून काही प्रमुख बाबी समोर आल्या. त्या खालीलप्रमाणे :

  • ५२ टक्‍के व्यक्ती म्हणाल्या की, पावसाळा आणि हिवाळ्यादरम्‍यान व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंट्सचे सेवन केल्‍यामुळे आजारी पडण्‍याचे प्रमाण कमी झाले.

  • ६१ टक्‍के महिलांना व्हिटॅमिन सी आजारामधून लवकर बरे करण्‍यामध्‍ये गुणकारी असल्‍याचे आढळून आले.

  • जवळपास ६० टक्‍के (५० टक्‍के नॉन-सप्‍लीमेंट युजर्ससह) व्यक्तींनी सांगितले की, व्हिटॅमिन सीमुळे आजारामधून लवकर बरे होण्‍यास मदत झाली.

  • ६५ टक्‍के व्यक्तींना असे वाटते की, व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्स एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये मदत करतात आणि व्हिटॅमिन सी हाडांचे आणि सांध्‍यांचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करू शकते, असे ५२% व्यक्तींना वाटते.

  • ७३% व्यक्ती या पुरेशा प्रमाणात पाणी पितात आणि आजारामधून लवकर बरे होण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन करतात.    

व्हिटॅमिन सी च्‍या कमी सेवनाचे परिणाम खालीलप्रमाणे :

  • व्हिटॅमिन सीच्‍या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते, असे ६०% लोकांना वाटते.

  • व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आजारामधून बरे होण्यास विलंब होतो, असे ३६ टक्‍के लोकांना वाटते.

डॉ. केतन मेहता पुढे म्‍हणाले की, ‘’ व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारकशक्‍ती वाढवण्यामध्‍ये आणि संसर्गांशी लढण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यामध्ये त्‍यांच्‍या भूमिकेवरील संशोधन अभ्‍यासांशी सुसंगत आहेत. दैनंदिन आहारामध्‍ये व्हिटॅमिन सीचा समावेश केल्‍याने व्‍यक्‍तींना रोगप्रतिकारकशक्‍ती प्रबळ राखत आरोग्‍यदायी राहण्‍यास मदत होऊ शकते.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT