Foods For Small Breast Size : अनेक महिलांना इतर महिलांच्या तुलनेत अधिक आकर्षित दिसावे अशी इच्छा असते. यासाठी अनेक महिला विविध प्रकारचा मेकअप करतात. मात्र, अनेकदा चांगला मेकअप करूनही स्तनांचा आकार लहान असल्याने त्या उठून दिसत नाही.
स्तनांचा आकार लहान असल्याने अनेक अनेक मुली आणि महिलांमध्ये न्यूनगंड तयार होतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. जे स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सुपर फुड ठरू शकतात. स्तनाचा आकार वाढवण्यासाठी इस्ट्रोजेनयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्य आहे. यामध्ये सर्वात पहिले नाव येते सोया पदार्थांचा.
सोया पदार्थ
स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सोया पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये तुम्ही सोया दूध, सोयाबीन, टोफू, पनीर आदी पदार्थांचे सेवन करू शकता. सोया उत्पादनांमध्ये भरपूर प्रथिने असतात. यामुळे स्नायूंच्या विकासास मदत होते. प्रथिनांसोबतच यामध्ये आयसोफ्लाव्होनही भरपूर प्रमाणात असते. जे इस्ट्रोजेनसारखे कार्य करतात आणि स्तन वाढवण्यास मदत करतात.
समुद्री मासे
समुद्री माशांमध्ये ओमेगा ३ मुबलक प्रमाणा असते. याच्या सेवनामुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे स्तनाचा आकार वाढू लागतो. समुद्री माशांमध्ये तुम्ही झिंग्यांचा आहारात समावेश करू शकता.
मेथी
मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजेन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे चांगले पोषण स्तनापर्यंत पोहोचते.
दूध
दुधाचे नियमित सेवन केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात आणि रक्ताभिसरणही सुधारते. दुधामुळे प्रजनन क्षमताही सुधारते. हे सर्व स्तनाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे किंवा मुलींचे स्तन आकाराने लहान आहेत. त्यांनी नियमित दूधाचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.
लीन मीट
लीन मीटमुळे स्तनाचा आकार वाढण्यास मदत होते. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
सीड्स
सीड्समध्ये हेल्दी फॅट मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स सुधारण्यास आणि नियंत्रित राहण्यास मदत होते. स्तनांचा आकार वाढीसाठी तुम्ही आहारात फ्लॅक्ससीड, सूर्यफूल, भोपळा, तीळ इत्यादींचा समावेश करू शकता.
ब्रेस्ट मसाज आवश्यक
स्तनाचा आकार वाढवण्यासाठी मसाजदेखील चांगले काम करते. स्तनाची मालिश नियमितपणे करावी. यामुळे स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्तनांचे स्नायूही वाढतात. त्यामुळे स्तनांची हळूहळू वाढ होते. मसाजसाठी तुम्ही खोबरेल तेल, मोहरीचे तेल, एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने मसाज करू शकता. मसाज करण्यापूर्वी तेल गरम करावे आणि नंतर गोलाकार स्वरूपात स्तनांची मालीश करावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.