Women Health Problems esakal
आरोग्य

Women's Health : वयाच्या ४० शी नंतरही फिट जगायचं आहे? मग चुकूनही करु नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष

जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या इतर स्त्रिया ४० शी टप्यात पोहोचल्या असतील, तर सावधान या गोष्टी...

सकाळ डिजिटल टीम

Women Health Problems : वयाच्या ४० व्या वर्षांनंतर असे लक्षात आले आहे की, महिलांना अनेक आजार घेरायला लागतात. यात अनेक प्रकारचे गंभीर आजारही होऊ शकतात. वयाच्या ४० शीनंतर स्त्री मेनोपॉजच्या जवळ असते आणि त्यामुळे शरीरात अनेक प्रकारची कमतरता येऊ लागते.

आरोग्याच्या दृष्टीने ४० वर्षांनंतर महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांना भेडसावणाऱ्या काही समस्या इथे आहेत. हे आजार होवू नयेत म्हणून महिलांनी आपल्या शरीराच्या लहानसहान तक्रारींकडेही दुर्लक्ष करु नये, हे गरजेचे आहे.

वेळेवर चाचण्या करून रोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या इतर स्त्रिया ४० शी टप्यात पोहोचल्या असतील, तर सावधान या गोष्टी आणि आजाराची ही लक्षणं दिसली तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.

१. मुतखडा (Kidney Stone)

किडनी स्टोन हे खरे तर खडे नसून मूत्रमार्गात दगडांचे साठे असतात, ते खूप वेदनादायक असतात आणि वयानुसार येण्याची शक्यता असते. जरी इतर कारणे देखील मूत्रपिंडातील दगडांना प्रोत्साहन देतात. बहुतेक असे मानले जाते की मूत्रपिंड दगड पुरुषांमध्ये सामान्य आहेत, परंतु स्त्रियांमध्ये देखील हे दिसून येते. तीव्र पाठदुखी, लघवीमध्ये रक्त येणे, ताप आणि थंडी वाजणे, उलट्या, दुर्गंधीयुक्त लघवी आणि लघवी करताना जळजळ होणे ही किडनी स्टोनची काही धोक्याची चिन्हे आहेत.

२. संधिवात (Arthritis)

४० वर्षांनंतर बहुतेक महिलांना संधिवाताचा त्रास सुरू होतो. सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो किंवा पोटऱ्या सुजतात किंवा काम करतांना हात आखडतात, यावर वेळीच उपचार न केल्यास हा गंभीर आजार होऊ शकतो.

३. मधुमेह (Diabities)

आजकाल डायबीटीसची सुरुवात अगदी तरुणांमध्येही दिसून येते तरीही वयाच्या ४० वर्षांनंतर महिलांमध्ये डायबीटीसचा धोका वाढतो. थकवा, घशाला कोरड पडणे, अंधुक दृष्टी, सपाट्याने वजन कमी होणे किंवा वाढणे, सतत लघवीला लागणे, हिरड्या मऊ पडणे ही महिलांमध्ये मधुमेहाची काही लक्षणे आहेत.

४. ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis)

वयाच्या चाळीशीनंतर हाड ठिसुळ होऊ लागतात, हार्मोन्समधील बदलामुळे शरीराच्या संरचनेवरही मोठा परिणाम होतो. स्त्रियांना नेहमीच कॅल्शियमचे सेवन आणि व्हिटॅमिन डीच्या पातळीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो ज्याने हाडांच्या आरोग्यास (bone density) त्रास होणार नाही.

५. युरीन इन्फेक्शन (Urine Infection)

हा त्रास अनेक महिलांमध्ये दिसून येतो, जेकी अजिबात चांगलं लक्षण नाही. वाढत्या वयामुळे लघवीला मदत करणाऱ्या नसा कमकुवत होतात. शिवाय, वयोमानानुसार, मूत्राशयाचे स्नायू जाड होतात आणि त्यांची लवचिकता गमावतात. यामुळे व्यक्ती लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. खोकताना आणि शिंकतानाही एखादी व्यक्ती लघवी थांबवू शकत नाही तेव्हा लघवीच्या समस्या उद्भवते.

अशी काळजी घ्या (Tips for women's health)

१. वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी नियमितपणे स्वतःची चाचणी (Full Body Check-Up) करुन घ्यावी.

२. ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) बहुतेक वृद्ध महिलांमध्ये होतो, यासाठी तुम्ही ब्रेस्ट टेस्ट करुन घ्यावी.

३. वृद्धत्वामुळे उच्च किंवा कमी रक्तदाब (High or Low BP) असणे सामान्य आहे, म्हणूनच आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. रोज व्यायाम करा, व्यायाम नियमित केल्यास रक्तदाब (Blood Presure BP) नियंत्रणात राहतो.

४. जर तुमचे वजन विनाकारण वाढत असेल किंवा केस गळत असतील तर थायरॉईडची (Thyroid) तपासणी करुन घ्या.

५. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि सकाळी उठून एक ग्लास पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT