Health Care : कामाच्या गोंधळामुळे लोकांना स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाहीये. त्यामुळे योग, मुद्रा याकडेसुद्धा लोकांचे दूर्लक्ष होत चालले आहे. मात्र तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत योग मुद्रेचा समावेश करून घेतला पाहिजे.
योगात काही आसने येतात, जी शरीरातील वाहिन्या सक्रिय करण्यास मदत करतात. बोटांच्या मदतीने केलेली ही योगासने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि तुमच्या श्वसनसंस्थेतील समस्या दूर करण्यात मदत करतात. या मुद्रांपैकी आदिमुद्रा तुमच्या श्वासोच्छवासाची समस्या दूर करण्यात मदत करते. आदि मुद्रा करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
श्वसनासंबंधित समस्या असल्यास आदि मुद्रेचे फायदे
फुफ्फुसांमधील सुजन कमी करते
आदिमुद्रेच्या सरावाने फुफ्फुसाची जळजळ कमी होण्यास मदत होते. या योगासनामुळे तुमची श्वसन प्रणाली मजबूत होण्यास मदत होते. यामुळे श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांची जळजळ कमी होण्यास मदत होते.
फुफ्फुसांमधील इन्फेक्शन कमी करते
आदि मुद्रा फुफ्फुस आणि श्वसन प्रणालीचे संक्रमण कमी करण्यास मदत करते. या मुद्रेद्वारे ऊर्जेची पातळी सुधारते. यामुळे ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारखे श्वसनमार्गाचे आजार कमी होण्यास मदत होते.
आदिमुद्रेमुळे सर्दीचा त्रासही कमी होतो
श्वसनसंस्थेतील संसर्गामुळे सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो. या समस्येत तुम्ही आदिमुद्रेचा सराव करू शकता. ही मुद्रा तुमचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि सर्दी इत्यादी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
मानसिक शांतीसाठी उपयुक्त
आदि मुद्रा ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते. श्वासोच्छवासाची यंत्रणा उत्तम असल्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहते. त्यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि तुमची चिंता आणि तणावापासून सुटका होते.
उर्जेचा स्तरही वाढतो
आदि मुद्रेचा रोज सराव केल्यास शरीरात ऑक्सिजनचा स्तर वाढेल. ज्यामुळे शरीरात रक्ताचा आणि ऑक्सिजनचा स्तर वाढतो.सुधारित ऑक्सिजन पातळी पेशींना दुरुस्त करण्यास मदत करते. तसेच उर्जेतही वाढ होते. (Yogasana)
आदी मुद्रेचा सराव करण्याची योग्य पद्धत
आदि मुद्रा करण्यासाठी, शांत स्थितीत आरामदायी मुद्रेत बसा.
डोळे बंद करा आणि मन शांत करा.
हात जोडून घ्या.
तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा.
यानंतर हात मुठीप्रमाणे बंद करा.
परंतु, यावेळी तुमचे अंगठे आतील बाजूस ठेवा.
तुम्ही हे 15 ते 20 मिनिटांसाठी करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.