आरोग्य

Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा..

या संपूर्ण वेळात आपण किती चहा प्यायलो आहोत याची खबरबादही अनेकांना नसते.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही जर चहाप्रेमी असाल आणि चहा हे तुमच्या अत्यंत आवडीचं आणि जवळचं एक पेय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्यानंतर आधी चहा लागतो. चहाशिवाय आमची सकाळ फ्रेश होत नाही असं वाक्य तुम्ही अनेकांकडून ऐकलं आहे. इथून जो चहाचा प्रवास सुरु होतो तो दिवसभर आणि अगदी रात्रीपर्यंत सुरु असतो. मग या संपूर्ण वेळात आपण किती चहा प्यायलो, याची खबरबादही अनेकांना नसते. मग यामुळे पित्त, जळजळ सुरु होते.

सकाळी किंवा दिवसभर जेवणानंतर एक कप चहा पिण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे मात्र ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण जेवणानंतर चहा पिण्याची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टेरॉइड हार्मोन्स वाढवते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपण जेवल्यानंतर चहा पिल्याने आरोग्याला काय नुकसान होते ही माहिती पाहणार आहोत...

  • जेवणानंतर चहा पिल्याने काय नुकसान होते?

रक्तदाब वाढतो

जे लोक जेवणानंतर चहा पितात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणानंतर चहा पिऊ नका.

हृदयासाठी हानिकारक

जेवणानंतर लगेच चहा पिल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या (पचनसंस्थेच्या समस्या वाढवा) उद्भवू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिल्याने शरीराची पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. इतकंच नाही तर त्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वही मिळत नाहीत. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने माणसाला गॅस, अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो.

डोकेदुखीचे कारण

जेवणानंतर चहा घेतल्यास डोकेदुखी होऊ शकते. जेवल्यानंतर लगेचच चहा पिल्याने शरीरात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. शरीरात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो. तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती लगेच सोडा. या सवयींमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही वेगवान होतात.

लोहची कमतरता जाणवते

जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवू शकते. चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण करु शकत नाही. ज्यामुळे लोह किंवा रक्ताची कमतरता भासू शकते. चहामध्ये आढळणारे फिनोलिक कंपाऊंड लोहाच्या शोषणात व्यत्यय आणते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT