Fatty Liver Symptoms and Causes: लिव्हर अर्थात यकृतामध्ये अतिरिक्त प्रमाणात फॅट जमा झाल्याने फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. या आजारात व्यक्तीचे लिव्हर योग्यरित्या काम करत नाही. जवळपास ३ पैकी एका व्यक्तीला या आजाराचा सामना करावा लागतो. फॅटी लिव्हरमुळे इतरही समस्या उद्भवतात. यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉइड सारख्या समस्या होऊ शकतात.
फॅटी लिव्हर आजार २ प्रकारचा आहे. जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो. तर योग्य आहार नसल्यास नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो. सध्या दारू बहुतांश लोकांच्या लाइफस्टाइलचा भाग झाली आहे. मात्र, याच्या अधिक सेवनामुळे तुम्हाला यकृताशी संबंधित वेगवेगळे आजार होऊ शकतात. यामुळे अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर, अल्कोहॉलिक हेपेटाइटिस आणि अल्कोहलिक सिरोसिस आजार होण्याची शक्यता आहे.
दारुमुळे लिव्हरशी संबंधित आजाराची काही लक्षणं देखील दिसू लागतात. ही लक्षणं दिसत असल्यास तुम्ही वेळीच योग्य उपचार घेऊ शकता. दारूमुळे लिव्हरशी संबंधित दिसणाऱ्या आजारांच्या लक्षणांबाबत जाणून घेऊया.
अल्कोहॉलिक फॅटी लिव्हरची लक्षणं
वजन कमी होणे- तुम्ही जर मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करत असाल तर आहारावर याचा परिणाम होतो. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होते. अशी लक्षणं दिसत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. फॅटी लिव्हर आजारामुळे शरीरात अनेक बदल पाहायला मिळतात.
मळमळणे व उलटी - अल्कोहॉलिक हेपेटाइटिसची समस्या असल्यास मळमळ आणि उलटी सारखी लक्षणं दिसू लागतात. याशिवाय, पोटदुखी, ताप येणे अशी लक्षणंही असू शकतात.
हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
भूक न लागणे - तुम्ही जर जास्त दारू पित असाल तर भूक देखील कमी होऊ शकते. तुमच्यासोबतही असे होत असल्यास ही लिव्हरशी संबंधित आजाराची लक्षणं असू शकतात. भूक न लागल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते व यामुळे लिव्हरच्या पेशींचे नुकसान होते.
थकवा जाणवणे - लिव्हरशी संबंधित आजार असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम थकवा जाणवेल. अशक्तपणा आणि थकवा ही लिव्हरच्या आजाराशी संबंधित लक्षणं आहेत. तसेच, वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.