Alka Yagnik esakal
आरोग्य

Alka Yagnik : हेडफोनच्या अतिवापरामुळं ऐकू येणं बंद होतं? काय आहे अलका याज्ञिक यांना झालेला आजार आणि लक्षणं

Alka Yagnik: सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना कानाशी संबंधित एक दुर्मिळ आजार जडला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Alka Yagnik : नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. अलका यांना कानाशी संबंधित एक दुर्मिळ आजार जडला आहे. या आजारामुळे त्यांची ऐकू येण्याची क्षमता नष्ट झाली आहे. या संदर्भात अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या आजाराचा उल्लेख केला असून, त्यांनी चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच त्यांनी पोस्टमध्ये म्हटलयं की, 'मी माझ्या चाहत्यांना आणि तरूण सहकाऱ्यांना खूप मोठ्या आवाजातील संगीत आणि हेडफोनच्या अधिक संपर्कात ने येण्याबाबत चेतावणी देऊ इच्छिते. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच राहुद्या', अशा शब्दांमध्ये त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

अलका याज्ञिक यांना जडलेल्या आजारामुळे मनोरंजन विश्वात खळबळ माजली असून त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अलका याज्ञिक यांना झालेला हा सेन्सरी न्यूरल हियरिंग लॉस हा दुर्मिळ आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

न्यूरल हियरिंग लॉस

काही आजारांमुळे कानातून ऐकण्याची क्षमता कमी होते. हे सर्व हळूहळू घडते. परंतु, अचानक ऐकू न येणे हा एक उद्भवणारा सेन्सरी न्यूरल हियरिंग लॉस आजार आहे. या आप्तकालीन स्थितीमध्ये व्यक्तीला अचानक ऐकू येणे बंद होते. या आजारावर प्राथमिक अवस्थेत उपचार घेणे महत्वाचे आहे. अन्यथा पीडित व्यक्तीला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.

हा आजार उद्भवण्यामागची कारणे काय आहेत?

हा आजार अचाकनपणे उद्भवतो त्यामुळे स्पष्टपणे कारण सांगता येत नाही, ज्याला इडिओपॅथी असे म्हटले जाते. या आजाराचे कारण केवळ १५ टक्के रूग्णांमध्ये स्पष्ट होऊ शकते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

खरे तर ऐकण्यास मदत करणाऱ्या आठव्या क्रॅनियल नर्व्हवर व्हायरल इन्फेक्शनमुळे जेव्हा दबाव येतो, तेव्हा त्याचे कार्य विस्कळीत होऊन कानाला सूज येते. साधारणपणे ४०-५० वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो.

कानामध्ये अचानक दुखापत होणे, संसर्ग होणे, कानातील मळ अधिक झाल्यास किंवा कानाला सूज आल्यामुळे अचानक श्रवणशक्ती कमी होते किंवा ऐकायला कमी येते.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

  • अचानक श्रवणशक्ती कमी होणे.

  • एका कानाने ऐकू कमी येणे.

  • कान जड होणे.

  • कानाला अचानक सूज येणे.

  • कानाच्या बहिरेपणासोबतच चक्कर येणे.

  • कानात शिट्टीचा आवाज येणे.

  • कानाच्या आतील बाजूस सूज येणे.

  • कानाला संसर्ग होणे.

  • कानामध्ये ट्यूमर होणे.

  • मिनियर्स रोग किंवा एंडोथेलियममध्ये वाढ होणे.

या आजारावरील उपचार

या दुर्मिळ आजारावर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे, रूग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु, हे उपचार प्राथमिक अवस्थेत केले, तर अधिक उत्तम आहे. या आजारामध्ये कानाने ऐकू येण्याची क्षमता किंवा त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी ऑडिओमेट्रीची चाचणी केली जाते. तसेच, एमआरआय किंवा सिटी स्कॅन देखील केले जाते.

जर पीडित व्यक्तीच्या कानाच्या आतील शिरेला सूज आली असेल तर ताबडतोब ती सूज कमी करण्यासाठी स्टेरॉईड्स किंवा अँटीव्हायरल औषधे दिली जातात. ही औषधे टॅब्लेटच्या स्वरूपात दिली जातात. तसेच, कानाच्या शिरा किंवा कानाच्या पडद्याद्वारे थेट कानात इंजेक्शन दिले जाते. यासोबतच हायपरवेरिक ऑक्सिजन थेरपीच्या मदतीने हवेचा दाब वाढवला जातो. साधारणपणे या प्रकारचे उपचार या आजारावर केले जातात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT