- नीलम पवार
राग येणं हे स्वाभाविक आहे. लहानापासुन मोठ्यापर्यत कोणालाही कोणत्याही गोष्टीवरुन राग येऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे सतत राग येणे, चिडचिडेपणा करणे हा स्वभावच बनत चालला तर? काही जण रागावल्यावर त्यांच्या चेहऱ्यासोबतच पुर्ण शरीर थरथरते. राग येण्याचा आणि शरीर थरथरण्याचा काय संबंध आहे?
हेही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?
काही अभ्यासात हे दिसुन आले आहे की महिलांपेक्षा पुरुष जास्त रागीट असतात. राग आल्यावर एड्रलीन नावाचे विषारी टॉक्झीन निर्माण होते. हे पुर्ण शरीरात पसरते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे हृदयविकारही होतो. जे राग व्यक्त करु शकत नाही, त्यांच्याबाबत जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात.
राग आल्यानंतर शरीर थरथरण्याच्या समस्येपासुन अनेकजण त्रस्त असतात. यापाठीमागे मेडीकल कारणेही असु शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जे लोक संवेदनशील असतात, जे अधिक विचार करतात त्यांना जास्त त्रास सहन करावा लागु शकतो. जे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. अतिविचार करतात त्यांच्या मेंदुत स्ट्रैस हार्मोनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त तयार होते. हाच हार्मोन ब्लड प्रेशर वाढवतो. याचे प्रमाण वाढल्याने शरीरावरचे संतुलन जाते.
यामुळेच राग आल्यावर कंपन सुरु होते. राग कमी झाल्यावर हा हार्मोन कमी स्त्रवित होतो. परत शरीरावर मेंदुचे संतुलन येते. हे कमी करण्यासाठी योगासने करणे, व्यायाम करणे अशा प्रकारे उपाय करणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.