ayurved google
आरोग्य

आयुर्वेदिक औषधांचे सेवन सुरक्षित ठरते का ?

आयुर्वेदिक औषधांचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही असे समजून तुम्ही अतिप्रमाणात आयुर्वेदिक औषधाचे सेवन करत असाल तर सावधान !

नमिता धुरी

मुंबई : विविध प्रकारच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे महत्त्वाची मानली जातात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नसल्याचे सांगितले जाते; मात्र आयुर्वेदिक औषधांच्या दीर्घकालीन सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

नॅशनल लायब्ररी अॉफ मेडिसीनच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक औषधांचा वापर रोगांना प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. त्यांच्या दीर्घकालीन सेवनाने उलट्या, मळमळ, पोटदुखी, इत्यादी त्रास होऊ शकतात.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रेखा राधामणि यांनी आयुर्वेदाबाबत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अॅलोपथीप्रमाणे आयुर्वैदिक औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ नयेत असे त्यांनी सांगितले आहे. तसे केल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेदिक औषधांचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही असे समजून तुम्ही अतिप्रमाणात आयुर्वेदिक औषधाचे सेवन करत असाल तर सावधान !

अश्वगंधा एक विषारी वनस्पती आहे. याचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतानाही त्याचे सेवन केल्यास मासिक पाळी अनियमित होते. आपल्याकडे अॅलोपथीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर कोणतेही नियंत्रण नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या दुकानात ही ओषधे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आयुर्वेदिक औषधे कोणताही विचार न करता सहज घेतली जातात. याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी औषधे घेताना काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT