Fruits Diet Sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : सणासुदीचा काळ आणि आहार

गणपती आणि त्यानंतर लागोपाठ येणारे दसरा-दिवाळी यांसारखे सण सौख्य, समाधान, आनंद, आणि गोडाधोडाचे पदार्थ घेऊन येतात.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

गौरी- गणपती आणि त्यानंतर लागोपाठ येणारे दसरा-दिवाळी यांसारखे सण सौख्य, समाधान, आनंद, आणि गोडाधोडाचे पदार्थ घेऊन येतात. त्यावेळेस घरातील आवराआवर, खरेदी, फराळ इत्यादी गोष्टींची रेलचेल असते.

या काळामध्ये बरेच वेळेस अतिरिक्त खाणे, जेवण वेळेवरती न होणे, मैदायुक्त पदार्थ, साखर, तेल, मीठयुक्त पदार्थांचे सेवन, उशिरा झोपणे, डिहायड्रेशन, अॅसिडिटी, पोट बिघडणे, वजन वाढणे, थकवा, रोगप्रतिबंधक शक्ती कमी होणे, रक्तदाब, रक्तातील शर्करा वाढणे इत्यादी गोष्टी दिसू लागतात. अशा वेळी आपल्याला सर्व सणांची मौज-मजा अनुभवत आपली तब्येत जपणे हे हिताचे दिसते. त्या दृष्टीने आहारातील सोपे बदल आपले आरोग्य जपू शकतात.

  • मिष्टान्नांची निवड करताना चांदीचा वर्ख लावलेले, विकतचे माव्याचे पदार्थ तळावेत. त्यामध्ये भेसळ असू शकते.

  • घरी पदार्थ बनवताना- सुकामेवा, खजूर, अंजिरांचा वापर करून काकवी, गूळ, मध इत्यादी पदार्थांचा वापर करावा.

  • कृत्रिम रंग, स्वाद घातलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीजबरोबरच प्रीझरव्हेटिव्ह्‌ज, स्टॅबिलायझर्स इत्यादींचा समोवश असतो. असे पदार्थ टाळावेत.

  • विकतचे पदार्थ आणताना एक्स्पायरी डेट बघून आणावेत.

  • रोजच्या जीवनशैलीमध्ये योग्य प्रमाणात भाज्या व फळांचे प्रमाण नियमित राखावे.

  • पाण्याचे योग्य प्रमाण राखताना ताक, लिंबूपाणी, नारळाचे पाणी इत्यादी पदार्थाचा समावेश करावा.

  • सोडायुक्त, अतिरिक्त साखर असणाऱ्यागात शीतपेयांचा वापर टाळावा.

  • आहाराचे नियोजन करावे.

  • जेवताना सावकाश व दोन-तृतीयांश पोट भरेल इतके जेवावे. जेणेकरून अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होईल.

  • रोजचा व्यायाम, ध्यान, श्वसनाचे व्यायाम नियमित करावेत.

  • गोडाचा स्वयंपाक करताना विविध पदार्थांमध्ये चोथ्याचे प्रमाण वाढवावे.

  • आपली रोजची औषधे व डॉक्टरांबरोबरचे फॉलोअप नियमित ठेवावेत.

  • शांत व नियमित झोप शरीरासाठी आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त जागरणे टाळावीत.

  • पदार्थ शिजवताना वाफवणे, उकडणे, भाजणे, बेक करणे इत्यादी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा.

  • नेवैद्य म्हणून सुकामेवा, फळे, गुळाचे पदार्थ, पंचखाद्य इत्यादींचा वापर करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्यात राज ठाकरे सभा घेणार

TET Exam : टीईटी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर; डमी उमेदवारी रोखण्यासाठी फेस रीडिंग यंत्र बसविणार

Starlink India: इलॉन मस्क यांचं स्टारलिंक भारतात इंटरनेट क्षेत्रात करणार धमाका? ट्रम्प यांच्यासह भारत सरकारचे संकेत

DY Chandrachud: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चंद्रचूडांच्या पिठासमोर होण्याची शक्यता मावळली, आता...

"आम्हाला कधीच मूल नको हवं होतं" लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या दाव्याने सगळ्यांना बसला धक्का ; म्हणाली...

SCROLL FOR NEXT