pregnant women heart pain angioplasty sakal
आरोग्य

तर काय?

माझा पहिला मुलगा मला वयाच्या २९ व्या वर्षी झाला. त्यावेळी माझे वजनही खूप वाढले तसेच रक्तदाब व थायरॉइडचा त्रासही झाला. त्यामुळे दुसरे बाळ नको असा विचार केला.

सकाळ वृत्तसेवा

माझा पहिला मुलगा मला वयाच्या २९ व्या वर्षी झाला. त्यावेळी माझे वजनही खूप वाढले तसेच रक्तदाब व थायरॉइडचा त्रासही झाला. त्यामुळे दुसरे बाळ नको असा विचार केला. मध्यंतरी तुमच्या सेफ उपक्रमाविषयी वाचले. त्याचा आम्हाला काही उपयोग होऊ शकेल का ?

- आदिती काटदरे, पुणे

उत्तर - ‘सेफ’ अर्थात संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्स्पिरिअन्स हा प्रत्येक आई-वडिलांना एका स्वस्थ गर्भधारणेकरता व मातृत्वाकरता मदत नक्की करू शकतो. पहिल्या गरोदरपणात थायरॉइड, रक्तदाब वगैरे त्रास असले तर नक्कीच दुसऱ्या गर्भधारणेपूर्वी तयारी करणे चांगले असते. याकरता औषधोपचाराबरोबरच संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म, विशेषतः उत्तरबस्ती करून घेण्याचा फायदा होऊ शकेल. याबरोबरीने दिनचर्या तसेच आहाराचे व्यवस्थित पालन केल्यास गरोदरपणात अशा प्रकारचे त्रास फार कमी होताना दिसतात किंबहुना होतही नाहीत. प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल.

मला मागच्या वर्षी एकदम छातीत दुखायला लागले. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. अँजिओप्लास्टी केल्यावर परत तीन महिन्यांनी तशाच प्रकारचा त्रास होऊ लागला. तपासणी केल्यावर दुसऱ्या नसांमध्ये अवरोध असल्याचे आढळले. पुन्हा दुसरी अँजिओप्लास्टी केली. मी खरे म्हणजे आहार, दिनचर्या या सगळ्यांचे व्यवस्थित पालन करतो. पुढे परत असा त्रास झाला तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही असे डॉक्टर म्हणतात. मला बाय पास वगैरे करायची इच्छा नाही. काही उपचार सुचवू शकाल का?

- श्रीरंग देसाई, यवतमाळ

उत्तर - तुमच्या प्रश्र्नावरून रक्तदाब वगैरेंचा इतिहास कळू शकला नाही पण तरी आत्तापर्यंत दोनदा शस्त्रक्रिया झालेली आहे त्यामुळे यापुढे शस्त्रक्रिया टाळलेलीच बरे राहील. स्वतःची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने व शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा या दृष्टीने रोज सकाळी स्नानापूर्वी संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल नक्की लावावे. सकाळ-संध्याकाळ न चुकता हृदयासाठी उत्तम असलेले संतुलन सुहृदप्राशसारखे रसायन नक्की खावे.

मधुमेहाचा इतिहास असला तर त्यादृष्टीने आहाराची काळजी घेणे आवश्यक. बाहेरचे अन्न, जंक फूड वगैरे टाळणे इष्ट. सकाळ-संध्याकाळ घरचा सात्त्विक आहार घेणे जास्ती बरे. जेवणात २-३ चमचे घरी बनविलेले आयुर्वेदिक पद्धतीने बनविलिले साजूक तूप खाण्यात ठेवावे. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संतुलन शास्त्रोक्त पंचकर्मासारखे पंचकर्म करून शरीरशुद्धीनंतर हृद्बस्तीसारखे चांगले उपचार करून घेतलेले बरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT